google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education

Friday, September 6, 2024

PM-Poshan - शालेय पोषण आहार मेनू कार्ड सन २०२४-२५ धान्यादी मालाचे प्रमाण इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी

 

PM-Poshan - शालेय पोषण आहार मेनू कार्ड सन २०२४-२५ धान्यादी मालाचे प्रमाण इयत्ता पहिली ते पाचवी व इयत्ता सहावी ते आठवी

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या शालेय पोषण आहार साठी वर्ष 2024 25 पाककृती व मेनू कार्ड पुढील प्रमाणे.



शालेय पोषण आहार (मेनू कार्ड) सन २०२३ २०२४


सोमवार

उसळ / भाजी-आमटी (वाटणा)

मंगळवार

आमटी भात/ डाळतांदळाची खिचडी (मुगडाळ)

3

बुधवार

वरणभात/ सांबरभात / आमटी भात (तुरडाळ)

गुरुवार

कडधान्याची उसळ/भाजी आमटी/ (मटकी)

शुक्रवार

उसळ / भाजी आमटी (वाटणा)

शनिवार

आमटी भात/ डाळतांदळाची खिचडी (मुगडाळ)

वरील वरील वारानुसार असलेल्या मेनू हा जिल्हा नुसार बदलू शकतो परंतु त्याखाली असलेले धान्यादी मालाचे प्रमाण मात्र सर्व जिल्ह्यांसाठी सारखे आहेत.




 


मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२" अभियान - शाळा मूल्यांकन सुधारित व अंतिम वेळापत्रक दि ०६/०९/२०२४

 

मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२" अभियान - शाळा मूल्यांकन सुधारित व अंतिम वेळापत्रक दि ०६/०९/२०२४

शिक्षण आयुक्तांनी दिनांक 6 सप्टेंबर 2024 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा दोन राबविणे बाबत शाळा मूल्यांकनाचे सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे निश्चित केले आहे. 




शासन निर्णयान्वये सन २०२४-२५ मध्ये "मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा-टप्पा २" हे स्पर्धात्मक अभियान काही नवनवीन उपक्रमांसह राबविण्याबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. या कार्यालयाच्या संदर्भ क्र.२ व ३ वरील पत्रान्वये या बाबतच्या सविस्तर सूचना व शाळांनी माहिती भरणे व विविध स्तरावरील मूल्यांकन यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले आहे.

२/- सदर अभियानांतर्गत सदयस्थिती शाळास्तरावरुन माहिती भरण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलेले होते. तथापि, या बाबत अनेकवेळा सूचना देऊनही अदयापही शाळांकडून माहिती भरुन तो अंतिम केलेली नाही. त्याअनुषंगाने पुढीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

अ) सदर अभियानात भाग घेणाऱ्या ज्या शाळांनी आपली माहिती अपूर्ण भरलेली असेल, त्या सर्व शाळांची माहिती राज्यस्तरावरून दि.०६/०९/२०२४ रोजी आहे त्या स्थितीत अंतिम करण्यात येणार आहेत. यानंतर या शाळांच्या माहितीमध्ये कोणताही बदल करता येणार नाही. व सदरची शाळा मूल्यांकनासाठी केंद्र प्रमुख यांच्या लॉगिनला पाठविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

ब) या अभियानात शाळांचा मागील वर्षी (सन २०२३-२४ मध्ये) प्राप्त झालेला क्रमांक किंवा त्यापेक्षा निम्न क्रमांकासाठी या वर्षीच्या अभियानात विचार केला जाणार नाही. या वर्षीच्या मूल्यांकनात मागील वर्षातील स्तरापेक्षा (क्रमांक) वरच्या स्तरावरील क्रमांक मिळविण्यास या वर्षीच्या निकषाप्रमाणे शाळा पात्र होत असल्यास त्या क्रमांकास शाळा पात्र असतील.

३/- मूल्यांकन सुविधा ऑनलाईन करण्याचे सुधारित वेळापत्रक (अंतिम) :

अ) शाळा स्तरावरुन माहिती अंतिम करण्याचा दिनांक ०६/०९/२०२४

ब) प्रत्येक स्तरावरील मूल्यांकनांचा अंतिम दिनांक पुढीलप्रमाणे राहील.


मूल्यांकनाचा अंतिम दिनांक


 केंद्रस्तर

सोमवार, दि.०९/०९/२०२४. सायं.०५.०० वा. पर्यंत गुरुवार,

तालुकास्तर

 दि.१२/०९/२०२४, सायं. ००५.०० वा. पर्यंत

मनपा/जिल्हास्तर

सोमवार, दि. १६/०९/२०२४, सायं.०५.०० वा. पर्यंत

विभागस्तर

गुरुवार, दि. १९/०९/२०२४, सायं.०५.०० वा. पर्यंत

राज्यस्तर

सोमवार, दि. २३/०९/२०२४, सायं.०५.०० वा. पर्वत


४/- वरील सुधारित वेळापत्रक हे अंतिम असून यापुढे कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही. तरी, उक्त सूचना व सुधारित वळापत्रकानुसार सर्व शाळांची वेळेत माहिती भरली जाईल व प्रत्येक स्तरावर शाळांचे योग्य पध्दतीने मूल्यांकन पादृष्टीने कार्यवाहो करण्याची दक्षता घ्यावी. जाईल


अस्पचन (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक
                              Download

Thursday, September 5, 2024

जिल्हा परिषद शाळांचे नाव बदलणार

 जिल्हा परिषद शाळांचे नाव बदलणार 

महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई


तारीख: ०४ सप्टें २०२४


Ja.No.Mpraship/Sashi/U-Dice/Computer/2024-25/2638


प्रति,


1) आयुक्त, महानगरपालिका, सर्व.


2) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.


विषय: U-DICE Plus ऑनलाइन प्रणालीमध्ये PM SHRI योजनेंतर्गत मंजूर शाळेच्या नावापुढे "PM SHRI" हा उपसर्ग लावण्याबाबत.


संदर्भ: केंद्र सरकार पत्र क्र. D.O.No. 1-14/2022-9-19 दि. 30 ऑगस्ट 2024.


केंद्र सरकारने सन 2023-24 पासून पंतप्रधान श्री योजना लागू केली आहे. योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यात पहिल्या टप्प्यात एकूण ८२७ आणि दुसऱ्या टप्प्यात ३११ शाळांची निवड करण्यात आली आहे. राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने PM SHRI योजना लागू करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त दिनांक 30/08/2024 च्या पत्रानुसार PM SHRI योजनेंतर्गत मान्यता दिलेल्या शाळेच्या नावापुढे PM SHRI हे नाव जोडावे आणि त्यानुसार U-DICE Plus प्रणालीमध्ये शाळेचे नाव बदलावे.


U-DICE Plus प्रणालीमध्ये PM SHRI जोडलेल्या शाळेचे नाव, प्रमाणपत्र आणि


मार्कशीटवर ठळक अक्षरात दिसण्यासाठी सूचित केले आहे. पण याविषयी


U-DICE Plus प्रणालीमध्ये शाळेचे नाव संबंधित स्तरावरून अपडेट करा


आपल्या स्तरावरून आवश्यक ती कार्यवाही करावी


X:\computer doc U-DISE 2024-25\Letter_4 Dt. 04.09.2024.docx


जवाहर बाल भवन, पाहिलेला मजला, नेताजी सुभाष मार्ग, चर्नी रोड (प), मुंबई ४०० ००४.


दूरध्वनी क्रमांक: ०२२-२३६३ ६३१४, २३६७९२६७, २३६७ १८०८, २३६७ १८०९, २३६७ ९२७४

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

                       Download

Friday, August 30, 2024

शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी शिक्षण सेवा पंधरवडा अभियान राबविणेबाबत आदेश

 

शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे यासाठी शिक्षण सेवा पंधरवडा अभियान राबविणेबाबत आदेश

शिक्षण संचालनालय योजना कार्यालयातून निर्गमित दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजीच्या परिपत्रकानुसार राज्यात शिक्षण सेवा पंधरवडा अभियान राबविणे बाबत पुढील प्रमाणे परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे.

संदर्भ १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, शासन परिपत्रक क्रमांक संकिर्ण-२०२३/ प्रकर४५/टीएनटी-४, दि.८/९/२०२३. २. या संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंयो/२०२३/शि से.पंधरवडा/ आस्था-कार्या-१/२०६५, दि.६/१०/२०२३

परिपत्रक



शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वच स्तरातील जसे की विद्यार्थी, पालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी
 यांचे तालुका, जिल्हा, विभाग व राज्य पातळीवर प्रलंबित प्रश्न त्वरित निकाली काढणे, शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक करणे, तसेच प्रगत तंत्रज्ञानाच्या वापर करुन गतीमान व पारदर्शक पध्दतीने सेवा विहित कालमर्यादित देणे या उद्देश्याने दिनांक ५ सप्टेंबर पासून पुढील १५ दिवस "शिक्षण सेवा पंधरवडा" या पुढे दरवषी राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या संदभांतील संदर्भ १ वरील परिपत्रकान्वये शासनाने दिलेल्या सूचना पहाव्यात. 

२/ या सूचनांनुरूप शिक्षण सेवा पंधरवडा अभियानाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी अभियानात अंतर्भुत विविध विदयार्थी-पालकाभिमुख व प्रशासकीय घटकांशी संबंधित कामाच्या निपटा-यासाठी कालबध्द मांहिम आरजून प्रलंबित कामांचा निपटारा शासन निर्देशानुरुप करावयाचा आहे. संचालनालयाच्या स्तरावरुन या संदर्भात संदर्भ २ वरील परिपत्रकानुसार सर्व शिक्षणाधिकारी (योजना) यांना तसेच संबंधित घटकांना सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून यावधी देखील त्याची अंमलबजावणी करावयाची आहे.

या अभियानाच्या यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी करिता आगाऊ व व्यापक अशी प्रसिध्दी सर्व स्तरावर देण्यात यावी. जेणेकरुन या अभियानाचा सर्व घटकांना लाभ घेता येईल,

२. कार्यालयास प्राप्त अर्ज/निवेदने/तक्रारी यावर नियमानुसार कार्यवाही करुन ते निकाली काढावेत ३. सुनावणी ठेवावयाच्या प्रकरणांमध्ये तात्काळ सुनावणीचे आयोजन करण्यात यावे प्रकरण शक्यतो त्याच दिवशी निर्णित करावे,

४. शिक्षण सेवा पंधरवाड़ा अभियान कालावधीत व दर महिन्याच्या ५ तारखेला आयोजित करण्यात येणा- या दिनी प्राप्त अर्ज व निवेदने यावर त्याच दिवशी नियमांचित कार्यवाही करावी व ती निकाली काढावीत. ज्या प्रकरणी सुनावणी घेणे आवश्यक आहे त्या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणीचे आयोजन करावे. तसेच पुढील महिन्याच्या ५ तारखेच्या अगोदर सदर प्रकरण निकाली काढावे,

५. चिविध न्यायालयांमध्ये विभागाची प्रलंबित असलेली प्रकरणे पहाता न्यायालयीन प्रकरणांचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक आहे. ज्या प्रकरणांमध्ये अदयाप शासनाच्या वतीने शपथपत्र दाखल करण्यात आलेले नाही वा न्यायालयात उपस्थित राहीले नाहीत अशा प्रकरणी प्राधान्याने आवश्यक व उचित कार्यवाही कालमयदित करण्याची दक्षता घ्यावी, न्यायालयीन प्रकरणांकरीता नियमन तक्ता तयार करण्यात यावा.

६. सक्षम नियुक्ती प्राधिकारी यांनी अनुकंपा नियुक्ती प्रकरणांचा नियमित आढावा घ्यावा, प्रचलित शासन धोरण व तरतूदी विचारात घेवून वेळीच प्रकरणं निर्णित करावीत. त्याकरिता बिंदुनामावल्या अद्यावत करणे, प्रतिक्षा यादी अद्यावत करणे इत्यादी कार्यवाही प्राधान्याने करण्यात यावी.

७. कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी पांना आपली सेवा च कर्तव्ये प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आवश्यकते नुरुप राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचे मार्फत प्रशिक्षण आयोजित करावे, याबाबतचे कालबध्द नियोजन करुन प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करावे.

८. महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ मधील तरतुदीनुसार विभागीय चौकशी प्रकरणी विहित कार्यपध्दती अवलंबून कालमर्यादेत कार्यवाही होणे आवश्यक आहे. त्याच अनुसरुन विभागीय चौकशी सुरु करण्याचा निर्णय झाल्यानंतर बौकशी अधिकारी व सादरकर्ता अधिकारी यांची नियुक्ती करणे, चौकशी अधिकारी यांचे कडून चौकशी अहवाल प्राप्त करुन घेणे, चौकशी अहवालावर निर्णय घेवून अनुषंगिक आदेश निर्गमित करणणे वा गरजेनुरुप प्रकरण वरिष्ठ कार्यालयास सादर करणे बाबतची कार्यवाही करावी,


१. प्रशासकीय घटक-

(अ) कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ सेवापुस्तकातील नोंदी अद्यावत ठेवाव्यात. सेवापुस्तकाच्या दुष्यम प्रती साक्षांकित करुन देण्याच्या दृष्टीने आवश्यक ती कार्यवाही करावी. तसेच आवश्यकता भासल्यास त्या करिता शिबिराचे आयोजन करण्यात यावे. (ब) नियुक्ती प्राधिकारी/सक्षम प्राधिका-याने आपल्या अधिनस्त मंजूर पदांच्या बिंदु नामावल्या सक्षम प्राधिकारी यांचेकडून प्रमाणित करुन घ्याव्यात. या बाबत वेळोवेळी आढावा घेण्यात यावा.

(क) कार्यालयातील अभिलेख्यांची वर्गवारी करुन अभिलेख कक्षात जतन करण्यासाठी पाठवावयाचे अभिलेख, अभिलेख कक्षात पाठविण्यात यावेत, तसेच अभिलेख कक्षामध्ये असलेल्या अभिलेखाचा जतन कालावधी पूर्ण झाला असाल्यास विहित कार्यपध्दतीनुसार ते निलेखित करण्यात यावेत.

(ड) सर्व कार्यालयामध्ये अभिलेख्यांसंदर्भात सहा गड्डा पध्दतीचा अवलंब करण्यात यावा. सदर कार्यवाही विशेष मोहिम स्वरुपात राबविण्यात यावी पुढील १ महिन्यांमध्ये कार्यवाही पूर्ण करावी. कार्यालय प्रमुखांनी या बाबत नियोजन करुन दैनंदिन आढावा घ्यावा

(इ) जड वस्तू संग्रह नोंदवहीचे अद्यावतीकरण करणे. कार्यालयातील जडवस्तु संग्रह नोंदवहीतील नोंदी अदयावत करण्यात याव्यात. याबाबतचे आवश्यक ते पडताळणीचे दाखले वरिष्ठ कार्यालयास सादर करावेत. (ई) तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर कार्यक्षेत्रांमध्ये विद्यार्थी, पालक, अधिकारी-कर्मचारी यांचे उपयोगी इतर कोणताही उपक्रम राबवावयाचा असल्यास तो अभियान कालावधीत हाती घेवून राबविण्यात यावा. या बाबतचा अहवाल वरिष्ठ कार्यालयांमार्फत शासनास सादर करण्यात यावा. प्रभावी अंमलबजावणीसाठी बाचनिहाय कालबध्द कार्यक्रम निश्चित करण्यात यावा. 

१०. सदर अभियानाच्या यावा. विभाग व जिल्हा स्तरावर अंमलबजावणीचे संनियंत्रण करुन या अभियानाचा वेळोवेळी आढावा घेण्यात यावा. त्याबाबतचा एकत्रित अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे मार्फत शासनास व या संचालनालयास सादर करावा.


(डॉ. महेश पालकर) 

शिक्षण संचालक

शिक्षण संचालनालय (योजना)

महाराष्ट्र राज्य, पुणे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार शिक्षण विभाग अधिक कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करणे साठी शिक्षण सेवा पंधरवाडा अभियान राबवणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.


डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक तत्वज्ञ, आदर्श शिक्षक आणि विचारवंत होते. त्यांचा शिक्षण व राजनितीच्या क्षेत्रातील उत्कृष्ट योगदान व त्यांच्या विद्वत्तेबद्दल त्यांना सन १९५४ साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला होता. त्यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे ५ सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस सन १९६२ पासून शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिन हा शिक्षकांच्या कौतुकाचा एक विशेष दिवस आहे आणि या दिवशी त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधुन स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मा. मंत्री (शालेय शिक्षण) महोदयांच्या संकल्पनेस अनुसरुन "शिक्षण सेवा पंधरवडा आयोजित करावयाचा आहे. शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्वच स्तरातील जसे की विद्यार्थी, पालक, शिक्षक- शिक्षकेत्तर कर्मचारी, अधिकारी यांचे अनेक प्रश्न तालुका, जिल्हा, विभाग व राज्यस्तरावर प्रलंबित आहेत. या कारणासाठी त्यांना संबंधित कार्यालयात वारंवार भेटी द्याव्या लागत आहेत आणि या कारणामुळे त्यांचा अमूल्य वेळ वाया जात आहे. त्यांच्या वेळेची बचत व्हावी आणि त्याचबरोबर त्यांना त्यांच्या सेवा विहित कालमर्यादेमध्ये उपलब्ध होणे आवश्यक आहे.

वरील संपूर्ण शासनाचे पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


आपल्याला आपल्या शाळेसाठी लोकसहभाग मिळवायचा आहे मग त्वरित नोंदणी करा विद्यांजली पोर्टलवर!! Registration link

 

आपल्याला आपल्या शाळेसाठी लोकसहभाग मिळवायचा आहे मग त्वरित नोंदणी करा विद्यांजली पोर्टलवर!! Registration link

आपल्याला आपल्या शाळेसाठी लोकसहभाग मिळवायचा आहे मग त्वरित नोंदणी करा विद्यांजली पोर्टलवर!! 


जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था बुलढाणा दिनांक 29 जुलै 2022 रोजी काढलेल्या एका पत्रानुसार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या मध्ये त्यातील लक्ष साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोक सहभागाचा तसेच खाजगी क्षेत्राचा सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केली आहे. याकरिता विद्यांजली 2.0 पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यांजली 2.0 अ वॉलेंटियर मॅनेजमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम शाळांकरिता साह्यभूत असून या दृष्टीने शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली द्वारा सदर कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आले आहेत शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी लोकसहभागाची अत्यावश्यक भूमिका आहे विद्यांजली 2.0 हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनाचे एकत्रीकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणाली मध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद केले आहे.

शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसभा आणि स्वयंसेवी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यांजली 2.0 विकसित केली असून या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात.

कृतिशील जेष्ठ नागरिक माजी विद्यार्थी स्थानिक समुदायातील व्यक्ती शिक्षित स्वयंसेवक निवृत्त वैज्ञानिक शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी सशस्त्र दलातील व्यक्ती गृहिणी साक्षर व्यक्ती हे शाळेच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात तज्ञता क्षेत्र योगदान सेवा कृती मालमत्ता साहित्य उपकरणे प्रशासक या क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान करू शकतात.

तद अनुषंगाने आपल्या अधिनिस्त असणाऱ्या पर्यवेक्षेयंत्रणेतील क्षेत्रीय अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व कार्यक्षेत्रात तीन स्वयंसेवी संस्था यांना.. 

आपल्याला आपल्या शाळेसाठी लोकसहभाग मिळवायचा आहे मग त्वरित नोंदणी करा विद्यांजली पोर्टलवर!! 


जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था बुलढाणा दिनांक 29 जुलै 2022 रोजी काढलेल्या एका पत्रानुसार शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 या मध्ये त्यातील लक्ष साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोक सहभागाचा तसेच खाजगी क्षेत्राचा सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केली आहे. याकरिता विद्यांजली 2.0 पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यांजली 2.0 अ वॉलेंटियर मॅनेजमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम शाळांकरिता साह्यभूत असून या दृष्टीने शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली द्वारा सदर कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आले आहेत शालेय शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी लोकसहभागाची अत्यावश्यक भूमिका आहे विद्यांजली 2.0 हे देशभरात दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनाचे एकत्रीकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणाली मध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद केले आहे.

शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसभा आणि स्वयंसेवी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यांजली 2.0 विकसित केली असून या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात.

कृतिशील जेष्ठ नागरिक माजी विद्यार्थी स्थानिक समुदायातील व्यक्ती शिक्षित स्वयंसेवक निवृत्त वैज्ञानिक शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी सशस्त्र दलातील व्यक्ती गृहिणी साक्षर व्यक्ती हे शाळेच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात तज्ञता क्षेत्र योगदान सेवा कृती मालमत्ता साहित्य उपकरणे प्रशासक या क्षेत्रामध्ये आपली सेवा प्रदान करू शकतात.

तद अनुषंगाने आपल्या अधिनिस्त असणाऱ्या पर्यवेक्षेयंत्रणेतील क्षेत्रीय अधिकारी मुख्याध्यापक शिक्षक व कार्यक्षेत्रात तीन स्वयंसेवी संस्था यांना.. 

https://vidyanjali.education.gov.in

या वरील विद्यांजली कार्यक्रमाच्या पोर्टलवर जाऊन शाळांची नोंदणी करणे बाबत अवगत करण्यात यावी या संदर्भात अधिक माहितीसाठी पत्रासोबत जोडलेल्या मसुदाचे सखोल अवलोकन करण्यात यावे.

असे निर्देश जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.






विद्यांजली वेब पोर्टल बद्दल सविस्तर माहिती.

शालेय शिक्षण व साक्षरता विभाग नवी दिल्ली यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन इ पी 2020 मध्ये त्यातील लक्ष साध्यतेच्या दृष्टिकोनातून लोकसहभागाच्या तसेच खाजगी क्षेत्राच्या सक्रिय सहभागाची आवश्यकता विशद केली आहे. विद्यांजली टू पॉईंट झिरो हॉलांड इयर मॅनेजमेंट प्रोग्राम हा कार्यक्रम शाळांकरिता सहाय्यभूत असून यादृष्टीने शिक्षा मंत्रालय नवी दिल्ली द्वारा सदरील कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आले आहेत.
शालेय शिक्षणाचा दर्जा वाढण्यासाठी लोकसभागाची अत्यावश्यक भूमिका आहे. विद्यांजली 2.0 हे देशभरातील दर्जेदार शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांची एकत्रीकरण करण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मध्ये सुद्धा शालेय शिक्षण प्रणालीमध्ये लोकसहभागाचे महत्त्व देखील नमूद केले आहे. शालेय शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी लोकसभा आणि स्वयंसेवी सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी शालेय शिक्षण आणि साक्षरता विभाग शिक्षण मंत्रालयाने एक स्वयंसेवक व्यवस्थापन प्रणाली विद्यार्थ्यांनी 2.0 विकसित केली असून या कार्यक्रमांतर्गत भारतीय नागरिक अनिवासी भारतीय तसेच नोंदणीकृत संस्था या शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांना कोणताही मोबदला मानधन न घेता सेवा प्रदान करू शकतात तसेच शालेय गुणवत्ता विकास कार्यक्रमात सहभाग घेऊ शकतात.
कृतिशील जेष्ठ नागरिक माजी विद्यार्थी स्थानिक समुदायातील व्यक्ती शिक्षित स्वयंसेवक निवृत्त वैज्ञानिक शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी सशस्त्र दलातील व्यक्ती गृहिणी साक्षर व्यक्ती हे शाळांच्या विनंतीनुसार स्वयंसेवक म्हणून काम करू शकतात. तज्ञता क्षेत्र योगदान सेवा कृती मालमत्ता साहित्य उपकरणे प्रशासक या क्षेत्रातील आपली सेवा प्रदान करू शकतात.

योगदानाच्या अटी व शर्ती.

सेवा व कृती योगदान:
सामान्य स्तरावरील सेवा कृती (जेनेरिक लेवल सर्विसेस अँड ऍक्टिव्हिटीज) 
विषय अध्यापनात सहकार्य, कला, कार्यानुभव, योग, क्रीडा, भाषा, व्यवसायिक कौशल्य यांच्या अध्यापन करणे, दिव्यांग विद्यार्थ्यांना अध्यापनास सहकार्य करणे, योग शिक्षणात सहभाग, व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पौष्टिक आहार मार्गदर्शन.

प्रायोजकत्व स्वरूपातील सेवा कृती (स्पॉन्सरशिप सर्विसेस अँड ऍक्टिव्हिटी) 
प्रशिक्षित समुपदेशक विशेष शिक्षण तज्ञ शारीरिक मानसिक स्वास्थ्य यातील समुद्रदेशक वैद्यकीय शिबिरे कला क्रीडा उपक्रम आरोग्य आणि स्वच्छता स्त्रोत शालेय भौतिक कामकाजासाठी अतिरिक्त मनुष्यबळ विद्यार्थ्यांसाठी तज्ञ शिक्षकांद्वारे उपचारात्मक अध्यापन दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिबिरे मुलांसाठी संरक्षण प्रशिक्षण इत्यादी बाबींचे प्रायोजकत्व स्वीकारणे.

मालमत्ता साहित्य उपकरणे योगदान:-

खाजगी साहित्य, वीज साहित्य, डिजिटल साहित्य, वर्गातील साहित्य, खेळ, योगा, आरोग्य व सुरक्षा साहित्य, अध्ययन अध्यापन साहित्य, देखभाल दुरुस्ती, कार्यालयीन स्टेशनरी, सेवा सहाय्य, गरजा नुरूप साहित्य, विज्ञान प्रयोगशाळा, कला व कार्यानुभव कक्ष, माहिती तंत्रज्ञान कक्ष, व्यवसाय मार्गदर्शन कक्ष, संरक्षण भिंती व प्रवेशद्वार, पिण्याच्या पाण्याची सुविधा व पाण्याची टाकी, स्वच्छतागृहे, खेळाच्या साहित्याने सुसज्ज मैदानी, रॅम, ग्रंथालय, आधुनिक स्वयंपाक गृहे, निवासी वस्तीगृहे, निवासी खोल्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग रचना तसेच स्थानिक कार्यालयीन गरजा.
रोख रकमेच्या स्वरूपात कोणतीही आर्थिक सहाय्य शाळांना स्वीकारता येणार नाही.
मागणी केलेली सेवा साहित्य प्राप्त झाल्यास शाळा त्यांची विनंती क्लोज करू शकतात.
मागणी केलेल्या सेवा साहित्यापेक्षा अतिरिक्त साहित्य किंवा सेवा देण्यास स्वयंसेवक किंवा संस्था तयार असल्यास सदर शाळा दुसऱ्या शाळेची शिफारस करू शकतात किंवा सेवा साहित्य मागणीपेक्षा कमी प्राप्त झाल्यास सदर शाळा ही इतर स्वयंसेवक किंवा संस्था यांना मागणी करू शकतात.

विविध घटकांच्या कर्तव्य व जबाबदाऱ्या:

1) शाळा:
विद्यांजली 2.0 पोर्टलवर शाळा यु-डायस व नोंदणीकृत मोबाईल क्रमांक वापरून नोंदणी करू शकतात.
शाळांना आवश्यक असणाऱ्या सेवा साहित्य सुविधा यांची पोर्टलवर यादी अपलोड करावी लागेल.
इच्छुक स्वयंसेवक संस्था यांची निवड करताना त्यांचा अनुभव पात्रता साधनांचा दर्जा या गोष्टी विचारात घेण्यात याव्या.
स्वयंसेवक संस्था यांची ऑनलाइन किंवा समक्ष सभा घेऊन त्यांच्या उपलब्ध वेळ व साह्याबद्दल निर्णय घ्यावा.
शाळांनी संबंधित स्वयंसेवक संस्था यांचे कागदपत्रे पार्श्वभूमी तज्ञत्व हे तपासून घेणे आवश्यक आहे उपरोक्त बाबींची पूर्तता केल्यानंतर शाळांनी स्वयंसेवक संस्था यांचे बरोबर करार करावा तथापि सदर करार विद्यांजली 2.0 पोर्टलचा भाग असणार नाही.
संबंधित स्वयंसेवक संस्था यांनी कोणत्याही प्रकारचे मानधन निधी वेतन देय असणार नाही फक्त शाळा त्यांना योगदानाबद्दल प्रमाणपत्र देऊ शकते मात्र या प्रमाणपत्राच्या आधारे शासकीय नोकरी अथवा अन्य कोणत्याही प्रयोजनात याचा लाभ घेता येणार नाही याची दक्षता घ्यावी.
शाळा अथवा शालेय प्रशासन आणि संबंधित स्वयंसेवक संस्था यांच्या पार्श्वभूमीची पडताळणी करून त्यांच्या क्षमतांचे मूल्यांकन अवलंबून करावे भविष्यात याबाबतीत काही प्रश्न निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळा अथवा शालेय प्रशासनाची राहील.

2) स्वयंसेवक/स्वयंसेवी संस्था:

स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्थांनी विद्यांजली 2.0 वेब पोर्टलवर नोंदणी करावी. नोंदणी करत असताना मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी प्रोफाइल मध्ये नमूद करणे अनिवार्य आहे.
स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था पोर्टलवरून शाळांच्या गरजांची माहिती घेऊ शकतात त्यांच्याकडे उपलब्ध असणाऱ्या सेवा व योगदानुसार राज्य जिल्हा तालुका पातळीवरील शाळा ते पोर्टलवरून निवडू शकतात.
स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था यांनी योगदान देण्यासाठी शाळांची निवड केल्यानंतर संबंधित शाळेकडे सेवा देण्यासंदर्भात सहमती दर्शवू शकतात.
स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था यांना शाळांनी चर्चेसाठी बोलावल्यास उपस्थित राहून आवश्यक प्रतिसाद देणे गरजेचे आहे.
स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था त्यांच्या योगदाना संदर्भात त्यांना आलेल्या अनुभवाबाबत शाळेला आदान प्रदान करू शकतात तसेच शाळा सुद्धा त्यांच्या सेवा व योगदानाच्या दर्जाबाबत स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था यांना अभिप्राय देऊ शकतात.

सेवा घेऊ इच्छिणाऱ्या शाळांनी संपूर्ण प्रक्रियेदरम्यान नोंदणी सभेची पूर्व सूचना सेवेची निश्चिती याबाबत वेळोवेळी अद्यावत सूचना संबंधित स्वयंसेवक अथवा स्वयंसेवी संस्था यांना देणे आवश्यक आहे.

Wednesday, August 28, 2024

शिक्षकेततर कर्मचारी संचमान्यता

 महाराष्ट्र शासन


शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक)


महाराष्ट्र राज्य, मध्यवती बिल्डिंग, डॉ. ॲनी बेझंट मार्ग, पुणे 411001


ईमेल: doesecondary1@gmail.com/doehighersec@gmail.com


दूरध्वनी क्रमांक: ०२०-२६१२१३९४/९६


जा.सं. शिष्मान्मा/संच मनयत/अशैक्षणिक/T-8/2023-24/4682


दिनांक: 28,08,2024


128 ऑगस्ट 2024


यांना, शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (उत्तर/दक्षिण/पश्चिम) शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद (सर्व)


विषय: 2023-24 शिक्षकेतर कर्मचारी मतदारसंघाची मान्यता...


संदर्भ :- सरकारी पत्र क्रमांक न्यायप्र/२०२३/पी.नं.३०/टीएनटी-२, दि. 28.06.2024


उपरोक्त विषयाबाबत शासन पत्र दि. 28.06.2024 रोजी प्राप्त झालेल्या सूचनांनुसार दिनांक 28.01.2019 च्या सुधारित योजनेनुसार 30.09.2023 रोजी नोंदवलेल्या आधार प्रमाणित विद्यार्थ्यांची संख्या विचारात घेऊन, 2023-24 या वर्षासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा संच मंजूर करण्यात आला आहे. एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत आणि जिल्हावार अनुज्ञेय पदांच्या मर्यादेत असलेल्या संस्था. मान्यताप्राप्त शिक्षणाधिकारी लॉगिन उपलब्ध करून दिले आहे.


दिनांक 28.01.2019 च्या सुधारित योजनेनुसार, एकूण मंजूर पदांच्या मर्यादेत हा संच जारी करण्यात यावा आणि जिल्हानिहाय मंजूर पदांची पडताळणी करून अतिरिक्त पदांना मंजुरी द्यावी. दिनांक 28.01.2019 च्या शासन निर्णयानुसार 30.09.2023 रोजी नोंदवलेल्या अशैक्षणिक पदांच्या बॅचची मान्यता आणि बॅच मान्यता जारी करण्याच्या तारखेच्या शेवटी - जर वैध विद्यार्थ्यांच्या आधार क्रमांकाच्या आधारे अनुज्ञेय पदे मूळ मूळ पदांपेक्षा जास्त असल्यास पदे, अशा पदांना मान्यता शासनाच्या पूर्वपरवानगीने करावी. शासन निर्णय क्रमांक. SSN-2015/P.No.12/TNT-2, दिनांक 07.03.2019 च्या फॉर्म आणि प्रक्रियेच्या अटी व शर्तींनुसार रिक्त पदे भरण्यासाठी प्रथम समायोजन केले जावे. समायोजन पूर्ण होईपर्यंत अशी मंजूर व मंजूर पदे भरता येणार नाहीत.


सन 2023-24 साठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मान्यता दि. 30.09.2023 रोजीचे अनुदानित आणि विनाअनुदानित आधार वैध विद्यार्थी संख्येच्या आधारावर केले गेले आहेत आणि मंजूर पदे पूर्वलक्षी प्रभावाने देय असणार नाहीत. याची नोंद घ्यावी.


(संपत सूर्यवंशी) इ


शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक)