google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education

Wednesday, October 23, 2024

यु-डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत appar id shasan nirnay

 
यु-डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत appar id shasan nirnay 



यु-डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत appar id shasan nirnay

यु-डायस प्लस प्रणालीमधून पूर्व प्राथमिक, इयत्ता १ली ते १२ वी पर्यंत विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करणेबाबत मार्गदर्शक सूचना.

संदर्भ : १) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. D.O.No.१- २७/२०२३-DIGED-Part (१) दि. ०२/०९/२०२४ रोजीचे पत्र.

२) कार्यालयाचे जा.क्र.मप्राशिप/सशि/यु-डायस/संगणक/ २०२४-२५/२८८१ दि. २५/०९/२०२४ रोजीचे पत्र.

३) भारत सरकार, शिक्षा मंत्रालय यांचे पत्र क्र. F.No.१-२७/ २०२३-DIGED-Part (१) दि. २१/१०/२०२४ रोजीचे पत्र.

उपरोक्त संदर्भिय पत्रान्वये केंद्र शासनाकडून देशातील प्रत्येक विद्यार्थ्यांला APAAR आयडी उपलब्ध करून देण्याचा राष्ट्रीय उपक्रम सुरु केला आहे. संदर्भिय पत्र क्र. १ व २ नुसार राज्यातील प्रथम प्राधान्याने यु-डायस प्रणालीमधून इयत्ता ९वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना APAAR आयडी उपलब्ध करून देण्याकरिता संदर्भिय पत्रात नमूद आहे.

संदर्भिय क्र. ३ नुसार केंद्र शासनाकडून राज्यातील सर्व प्राथमिक, उच्च

प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करण्यासाठी कळविण्यात आले असून यु-डायस सॉफ्टवेअरमध्ये सुविधा उपलब्ध करून दिली आहे. APAAR आयडी उपलब्ध करुन देण्यासाठी संदर्भिय क्र. १ व २ नुसार मार्गदर्शक सूचना उपलब्ध करून दिल्या आहे. त्या मार्गदर्शक

सूचनांच्या आधारे सर्व विद्यार्थ्यांचे APAAR आयडी तयार करण्याची कार्यवाही पूर्ण करून घेण्यात यावी.

APAAR आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देताना पुढील मुद्यांच्या प्रामुख्यांने समावेश करण्यात यावा :-

APAAR आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने संदर्भिय पत्र क्र.०१ व ०२ नुसार केंद्रशासनाकडून प्राप्त झालेल्या मार्गदर्शक सूचना व या कार्यालयाकडून मार्गदर्शक सूचना व प्रशिक्षण जिल्हयाचे सर्व संगणक प्रोग्रामर व तालुक्याचे MIS Coordinator यांना देण्यात आले असून शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण देण्याकरीता कळविण्यात आले आहे.

APAAR आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने Parent Teacher Meeting (PTMs) शाळास्तरावर आयोजित करुन पालकांकडून ना-हरकत प्रमाणपत्र (consent form) भरुन घेण्यात यावे.

APAAR आयडी तयार करण्याच्या अनुषंगाने सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना प्रशिक्षण गट स्तरावरुन प्रशिक्षण देण्यात यावे व दररोज आढावा घेण्यात यावा.

APAAR आयडी तयार करण्याचा राज्यस्तरावरुन दररोज आढावा घेण्यात येईल तसेच, विद्या समिक्षा केंद्रामार्फत त्याचा आढावा घेण्यात येईल. याचप्रमाणे, जिल्हा व तालुका स्तरावरुन APAAR आयडी तयार करण्याबाबत दररोज आढावा घेण्यात यावा व सदर अहवाल विभागीय उपसंचालक, शिक्षण संचालक, आयुक्त कार्यालय, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद कार्यालयास पाठविण्यात यावा.

APAAR आयडी विद्यार्थ्यांना उपलब्ध करुन दिल्यानंतर सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना सदर आयडी हा विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर प्रिंट करण्यासाठी कळविण्यात यावे.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक आठवड्याला आढावा घेऊन ज्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांना APAAR आयडी तयार करुन का दिले नाहीत याबाबत आढावा घ्यावा व त्याबाबतचा अहवाल आयुक्त कार्यालयास व या कार्यालयास पाठविण्यात यावा.

शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांनी जिल्हयातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्याने दि.२०/११/२०२४ पर्यंत APAAR आयडी उपलब्ध करुन देण्याच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व शाळेच्या मुख्याध्यापकांना आपल्या स्तरावरुन कळविण्यात यावे.


परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

                  Download

Tuesday, October 22, 2024

PAT संकलित चाचणी परीक्षा । गुणनोंद तक्ते

 PAT  संकलित चाचणी परीक्षा । गुणनोंद तक्ते 

अशाप्रकारे डाऊनलोड करा

डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा




विषय मराठी

Download


विषय गणित 

Download


विषय इंग्रजी

Download


Monday, October 21, 2024

PAT परीक्षा उत्तरसुची व मार्गदर्शिका

PAT परीक्षा answer key । शिक्षक मार्गदर्शिका



खालील लिंक वर क्लिक करा आणि डाऊनलोड करा

. https://drive.google.com/drive/folders/1ba7Y4piSpG-VGmxNZ6V3UfF_qedeteb9?usp=sharing

Sunday, October 20, 2024

राज्यात 'सीबीएसई' पॅटर्न.. नवीन शैक्षणिक सत्र आता 1 एप्रिल पासून? नवीन राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024

 

राज्यात 'सीबीएसई' पॅटर्न.. नवीन शैक्षणिक सत्र आता 1 एप्रिल पासून? नवीन राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024

सुकाणू समितीची मंजुरी; सीबीएसईप्रमाणे राहणार अभ्यासक्रम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तिसरी ते बारावीच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्याला सुकाणू समितीने मान्यता दिली. त्यानुसार केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) बहुतांश अभ्यासक्रम स्वीकारण्यात येत असल्याने राज्य मंडळाशी संलग्नित शाळांचे नवीन शैक्षणिक सत्र १५ जूनऐवजी १ एप्रिलपासून सुरू होणार आहे.



राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० यांचा अभ्यास करून राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) तिसरी ते बारावीसाठी अभ्यासक्रम आराखड्याचा मसुदा तयार केला होता. या मसुद्यात मनुस्मृतीचा संदर्भ देण्यात आल्याने यावरून अनेक वादविवाद झाले होते. या अभ्यासक्रम आराखड्यावर जवळपास तीन हजारांहून अधिक हरकती सूचना नोंदवण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सुकाणू समितीच्या बैठकीत चर्चा करून अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्याला अंतिम मान्यता देण्यात आली. नव्या धोरणात देशातील पारंपरिक, प्राचीन ज्ञानाची विद्याथ्यर्थ्यांना ओळख करून देण्यासाठी भारतीय ज्ञानप्रणाली या घटकाचा समावेश करण्यात आला आहे.

अशी असतील पाठ्यपुस्तके

राज्य मंडळाच्या शाळांसाठी सीबीएसईचा बहुतांश अभ्यासक्रम स्वीकारण्यात येणार आहे. त्यासाठी एनसीईआरटी, सीबीएसई यांच्याकडील पाठ्यपुस्तके इंग्रजी आणि हिंदी माध्यमांत उपलब्ध आहेत. अन्य माध्यमांसाठी या पाठ्यपुस्तकांचे भाषांतर

करून ती पाठ्यपुस्तके आवश्यक माध्यमांत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बालभारतीकडे सोपवण्यात आली. इतिहास, भूगोल अशा विषयांची पाठ्यपुस्तके स्थानिक, राज्य, राष्ट्रीय, जागतिक अशा आशयाचे करण्यात येणार आहे. मराठी भाषेची पाठ्यपुस्तके राज्यातच तयार करण्याचे ठरले आहे. महाराष्ट्रात राज्य मंडळाच्या शाळांचे वार्षिक वेळापत्रक १५ जूनपासून सुरू होते. एप्रिलमध्ये वार्षिक परीक्षा झाल्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्या लागतात. मात्र, आता सीबीएसईच्या वार्षिक वेळापत्रकानुसार १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक सत्राची सुरवात होईल. १ ते ३१ मे उन्हाळ्याच्या सुट्या राहतील. त्यानंतर पुन्हा १ जूनपासून शाळा सुरू होऊन मार्चमध्ये वार्षिक परीक्षा घेण्यात येतील.

अभ्यासक म्हणतात...

■ शिक्षण क्षेत्राचे अभ्यासक डॉ रूपेश चिंतामणराव मोरे यांनी सांगितले, 'राज्य मंडळाच्या शाळांमध्ये फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी, बारावी बोर्ड परीक्षा असतात. एप्रिलमध्ये शाळांच्या परीक्षा झाल्या की, १ मे ते १५ जून दरम्यान उन्हाळ्याच्या सुट्या असतात. १५ जूनपासून शैक्षणिक सत्र सुरू होते. प्रवेश नोंदणी, नवीन पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य खरेदी त्यानंतर प्रत्यक्ष अध्यापनाला जुलै उजाडतो. या उलट सीबीएसई शाळांचा मार्चमध्ये निकाल लागून १ एप्रिलपासून नवीन शैक्षणिक सत्र सुरू होते. एप्रिलमध्येच पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्यांची खरेदी झाल्याने मुलांना नव्या वर्गाच्या अभ्यासक्रमाची प्रत्यक्ष ओळख होईल. मे महिन्याच्या दीर्घ सुटीत मुले वाटेल तेव्हा पुस्तके वाचू शकतील. त्यामुळे त्यांना स्वयम् अध्ययनाची सवय लागेल. राज्य मंडळाच्या शाळांचे शैक्षणिक वर्ष सीबीएसई शाळांप्रमाणे करणे हे शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरेल.'




परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा


Saturday, October 19, 2024

Sanch Manyata 2024-25 Update - संच मान्यता डिसेंबर २०२४ पूर्वी जनरेट करुन शाळांना संच मान्यता मिळणार? आदेश

 

Sanch Manyata 2024-25 Update - संच मान्यता डिसेंबर २०२४ पूर्वी जनरेट करुन शाळांना संच मान्यता मिळणार? आदेश

दिनांक 18 ऑक्टोबर 2024 रोजी शिक्षण आयुक्तालयातून निर्गमित पत्रकानुसार शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक तसेच शिक्षण संचालक प्राथमिक यांना सन २०२४-२०२५ च्या प्राथमिक / माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचा संच मान्यता डिसेंबर २०२४ पूर्वी जनरेट करुन शाळांना संच मान्यता मिळणेबाबत पुढील प्रमाणे सूचना करण्यात आली आहे
विषयांकीत प्रकरणी निवेदनामध्ये नमूद केल्यानुसार सन २०२४-२५ ची संच मान्यता डिसेंबर २०२४ पूर्वी करण्याबाबत यथानियम कार्यवाही करुन संबंधितांना कळविण्यात यावे.
उपरोक्त विषयाबाबत शालेय शिक्षण विभागाचा संदर्भ क्र.2, दि. 15.03.2024 च्या शासन निर्णयान्वये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क अधिनियम, 2009 च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयानुसार सन 2024-25 पासूनच्या संच मान्यता सुधारित निकषानुसार ऑनलाईन करण्यात येणार आहे.

त्यानुषंगाने शालेय शिक्षण विभाग, शासन निर्णय संदर्भ क्र. 1, दि.28.08.2015 मधील निकषानुसार सन 2014-15 पासून ऑनलाईन संच मान्यता शिक्षणाधिकारी यांच्या लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात येत आहे. सन 2014-15 च्या संच मान्यतेत गत शैक्षणिक वर्ष 2013-14 मध्ये शिक्षणाधिकारी यांचेमार्फत निर्गमित करण्यात आलेल्या ऑफलाईन संच मान्यतेमधील मंजूर पदे नमूद करण्यात आलेली आहे.

सन 2014-15 ते सन 2016-17 या शैक्षणिक वर्षात विद्यार्थी संख्येमुळे कमी झालेली पदे विद्यार्थी संख्या असल्यास सन 2017-18 मध्ये मंजूर करणेसाठी शासनास प्रस्तावित करण्यात आले होते. त्यास अनुसरुन शासन पत्र संदर्भ क्र.3, दि.25.06.2020 अन्वये विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना पूर्वीचीच मंजूर पदे व विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे कमी झालेली पदे विद्यार्थी संख्येनुसार असल्यास 2013-14 मधील मंजूर पदांच्या मर्यादेत सन 2019-20 मध्ये मंजूर करण्याऐवजी सन 2018-19 च्या स्थितीच्या अनुषंगाने मंजूर करण्यास मान्यता दिलेली आहे. शासन पत्र संदर्भ क्र.4, दि. 17.07.2023 नुसार सन 2014-15 ते सन 2021-22 या कालावधीत विविध कारणास्तव संच मान्यता प्रलंबित असलेल्या शाळांच्या सन 2022-23 च्या संच मान्यता आधार प्रमाणित विद्यार्थी संख्या विचारात घेऊन मागील लगतच्या झालेल्या संच मान्यतेमध्ये मंजूर असलेल्या पायाभूत पदांच्या मर्यादेत करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे,

उपरोक्त नमूद शासन पत्र दि.25.06.2020 व 17.07.2023 अन्वये दिलेल्या निर्देशानुसार ऑनलाईन संच मान्यता दुरुस्ती करतांना काही शाळांना सन 2016-17 च्या संच मान्यतेमध्ये समायोजनाने दिलेल्या शिक्षकांची पदे दर्शविण्यात आली असून सदर शाळांना सन 2014-15 च्या ऑनलाईन संच मान्यतेमधील शै. वर्ष 2013-14 मधील नमूद मंजूर पदांपेक्षा जादा पदे अनुज्ञेय झाली असल्याचे दिसून येते

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा




General Election Vidhansabha 2024 Duty Update - निवडणूक काळात रजा नाही! वैद्यकीय रजेवर गेले तर त्याची तपासणी वैद्यकीय मंडळाकडून! कडून

 

General Election Vidhansabha 2024 Duty Update - निवडणूक काळात रजा नाही! वैद्यकीय रजेवर गेले तर त्याची तपासणी वैद्यकीय मंडळाकडून! कडून

निवडणूक कालावधीत कोणालाही वैद्यकीय रजेवर जाता येणार नाही आणि वैद्यकीय रजेवर गेले तर त्याची तपासणी वैद्यकीय मंडळ यवतमाळ कडून होईल मा. विभागीय आयुक्त अमरावती यांचे पत्र पुढील प्रमाणे


.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, अमरावती / अकोला / यवतमाळ / वाशिम / बुलढाणा

विषयः - निवडणूक कालावधीत वैद्यकीय रजेबाबत..

माझे असे निदर्शनास आले आहे की, निवडणूकीच्या कालावधीत काही निवडणूकीशी संबधित अधिकारी हे वैद्यकीय कारणास्तव रजेचे अर्ज सादर करतात. निवडणूक कालावधीतील जबाबदारीची आणि कालमर्यादीत कर्तव्ये पाहता कुणालाही सबळ कारणाशिवाय रजा देणे योग्य नाही. त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव अर्ज सादर केलेल्या प्रकरणात संबधित अधिकाऱ्यांची त्वरीत शासकीय वैद्यकीय मंडळामार्फत वैद्यकीय तपासणी करुन ते खरोखर शासकीय कामकाज करण्यास असमर्थ आहे किंवा कसे याची त्वरीत खात्री करावी व त्यानंतरच पुढील कार्यवाही करावी.

जर सरकारी नोकरीत दोघेही नवरा बायको असतील तर त्यापैकी फक्त एकाची इलेक्शन ड्युटी लागेल! 


लोकसभा निवडणूक 2024 मध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या कर्तव्याबाबत सूचना जारी करण्यात आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने हे निर्देश जारी केले आहेत. पती-पत्नी दोघेही शासकीय सेवेत असल्यास दोघेही निवडणुकीत ड्युटी करणार नसून, लोकसभा निवडणुकीत दोघांपैकी एकच कर्मचारी कर्तव्यावर असेल, असे निर्देशात म्हटले आहे. उत्तर प्रदेश मुख्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयाने हे निर्देश जारी केले आहेत. त्यासाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे अर्ज द्यावा लागणार असून त्या आधारे ते एका जोडप्याला कर्तव्यातून मुक्त करण्याचा निर्णय 

■ सरकारी सेवेतील दाम्पत्यांच्या अडचणी लक्षात घेता, दोघांपैकी एकाला अर्जाच्या आधारे निवडणूक ड्युटीतून सूट दिली जाईल.

■ सर्व जिल्ह्यांमध्ये निवडणुकीची माहिती अधिकारी/सहाय्यक जिल्हा निवडणूक अधिकारी यांना देण्यात यावी अशी विनंती करण्यात आली आहे.

■ आयोगाने आपल्या सूचनांची ही प्रत युनायटेड टीचर्स असोसिएशन, मिनिस्ट्रिअल कलेक्टर एम्प्लॉईज असोसिएशन आणि युनायटेड टीचर्स असोसिएशनला पाठवली आहे.



Friday, October 18, 2024

शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर अंतर्गत प्रशिक्षण बाबत SCERT आदेश

 

शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर अंतर्गत प्रशिक्षण बाबत SCERT आदेश

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र कार्यालयातून दिनांक 17 ऑक्टोबर 2024 रोजी निर्गमित आदेशानुसार प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व यांना नवनियुक्त शिक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर प्रेरण कार्यक्रम (Induction Program) अंतर्गत प्रशिक्षणाबाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मधील मुद्दा क्रमांक ५.१५ ते ५.२१ मध्ये नवनियुक्त शिक्षकांसाठी प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करणे अपेक्षित आहे. आपल्या जिल्ह्यातील नवनियुक्त शिक्षकांसाठी जिल्हास्तरावर ०७ दिवस, (५० तासांचे) प्रशिक्षण दिवाळीच्या सुट्टीच्या कालावधीत दि.०४.११.२०२४ ते १०.११.२०२४ या कालावधीत आयोजित करावयाचे आहे.

जिल्हास्तरावरील सूचना पुढीलप्रमाणे

१) इयत्ता १ली ते ८वी व इयत्ता ९ वी ते १२ वी साठी नवनियुक्त शिक्षकांचे ०७ दिवसांचे प्रशिक्षण सोबत दिलेल्या

वेळापत्रक व प्रशिक्षण घटकसंचाप्रमाणे आयोजित करण्यात यावे.

२) पहिले ६ दिवस इयत्ता १ ते ८ व इयत्ता ९ ते १२ वी ला शिकविणा-या शिक्षकांचे समान घटकांचे एकत्रित

प्रशिक्षण घ्यावयाचे आहे. सातवा दिवस हा स्वतंत्र घटकांसाठी असेल. ३) वेळापत्रकांची Soft Copy या पत्रासोबत पाठविण्यात येत आहे.

४) प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शक पुस्तिका उपलब्ध करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे प्रशिक्षणाचे नियोजन करावे.
५) आपल्या स्तरावर वर्ग संख्येनुसार आवश्यक सुलभकांची निवड करावी व त्यांना प्रशिक्षण घटक संचातील समाविष्ट घटकांची माहिती करून द्यावी.

६) सुलभकांना संदर्भ साहित्याचे वाचन करण्यास सांगावे.

७) सदर प्रशिक्षण हे ऑफलाईन स्वरूपात द्यावयाचे असून सलग ०७ दिवसांचे राहील. प्रशिक्षण कालावधीत कोणत्याही प्रकारची रजा अनुज्ञेय राहणार नाही (रविवार वगळून).

८) सदर प्रशिक्षणासाठी होणाऱ्या खर्चात दोन वेळचा चहा, कर्तव्य भोजन याचा. समावेश करता येईल. सदरचा खर्च समग्र TE Program Activity या लेखाशीर्षाखाली भागविण्यात यावा.

९) राज्यातील सर्व माध्यमाच्या शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्था शाळांतील सर्व नवनियुक्त शिक्षकांना हे प्रशिक्षण पूर्ण करणे अनिवार्य राहील.

१०) आपल्या जिल्ह्यातील १००% नवनियुक्त शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण होईल याची जबाबदारी संबंधित जिल्ह्यातील प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) यांची राहील. त्याअनुषंगाने आवश्यक ते समन्वय ठेवून यादी प्राप्त करून घ्यावी.

११) आपल्या मागणीप्रमाणे मार्गदर्शक पुस्तिका SCERT मार्फत संबंधित जिलागच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येतील.

१२) घटकसंचाची वाहतूक १८.१०.२०२४ पासून सुरु होईल व दिनांक २६.१०.२०२४ पर्यंत सर्व साहित्य संबंधित जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या ठिकाणी पोहोच होईल.


संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील वर Download क्लिक करा.

Download