Hello friends Welcome on my new blog Iam Gajanan Punde Teacher z.p.m.u.p.school Kajegaon , Jalgaon Jamod , iam a tech Teacher And successful Youtubers
Friday, January 24, 2025
प्रमाणपत्र - परिक्षा पे चर्चा 2025 नोंदणी / प्रमाणपत्र | परीक्षा वेतन चर्चा 2025 नोंदणी / प्रमाणपत्र | शासन परिपत्रक | विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी नोंदणी करावी.
Sunday, January 19, 2025
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा संभाव्य उततरसुती 2025
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा उत्तरसुती २०२५
नवोदय परीक्षा संभाव्य उत्तरसूची- नवोदय विद्यालय म्हणजेच जवाहर नवोदय विद्यालय ही भारतातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक विशेष शैक्षणिक संधी आहे. दरवर्षी नवोदय विद्यालय समिती (NVS) नवोदय प्रवेश परीक्षा आयोजित करते. या परीक्षेतून विद्यार्थ्यांची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाते. परीक्षेनंतर, संभाव्य उत्तरसूची विद्यार्थ्यांना आणि पालकांना त्यांच्या निकालाचा अंदाज घेण्यासाठी उपयुक्त ठरते. navodaya pariksha sambhavy uttrsuchi
Saturday, January 18, 2025
शिक्षकांना दिले जाणार पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार, प्रशिक्षण संचालकांचे आदेश...
शिक्षकांना दिले जाणार पाच दिवसांचे प्रशिक्षण दिले जाणार, प्रशिक्षण संचालकांचे आदेश...
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (State Council of Educational Research and Training) वतीने जिल्हा परिषदेसह सर्वच शासकीय आणि खासगी अनुदानित शाळांची गुणवत्ता (Improving the quality of government and private aided schools) वाढावी, म्हणून पुणे येथील मुख्य कार्यालयात शिक्षक सक्षमीकरण प्रशिक्षण व पर्यवेक्षीय यंत्रणेसाठी २० जानेवारीपासून प्रशिक्षण शिबिर घेतले जाणार आहे. तसे पत्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार (Rahul Rekhawar, Director of the Training Council) यांनी काढले आहे.राज्य स्तरावर प्रत्येक जिल्ह्यातील निवडक प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते बारावी इयत्तांना शिकविणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार असून, त्यांच्या माध्यमातून जिल्हास्तरावर आणि त्यांच्यामार्फत प्रत्येक तालुक्यातील शिक्षकांना शिक्षक सक्षमीकरणाचे प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणाचे आयोजन २० जानेवारीपासून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद देण्यात येणार असून त्यानंतर राज्यस्तरावरील प्रशिक्षणार्थी ३ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या कालावधीत आपापल्या जिल्हास्तरावर प्रशिक्षण देतील. १० फेब्रुवारी ते पारी ते ८ मार्चपर्यंत तालुकास्तरीय प्रशिक्षण होईल.
शिक्षक सक्षमीकरण शिबिर २० जानेवारीपासून पाच दिवसांच्या कालावधीत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे येथे होणार आहे. प्रशिक्षणामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० अंतर्गत राज्य अभ्यासक्रम आराखडा, शालेय शिक्षण, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा, क्षमताधारित मूल्यांकन, संकल्पना आदी विषयांचा समावेश आहे
Friday, January 17, 2025
*💥 आपणास किती टॅक्स पडत आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा
Income Tax calculator for financial year 2024-2025
Friday, January 10, 2025
राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती, राष्ट्रीय दिन साजरे करताना त्यांचा अल्प परिचय प्रदर्शित करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक -१०/१/२०२५
राष्ट्रपुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती, राष्ट्रीय दिन साजरे करताना त्यांचा अल्प परिचय प्रदर्शित करण्याबाबत शासन परिपत्रक दिनांक -१०/१/२०२५
जयंती आणि राष्ट्रीय दिन साजरे करताना 2025 पासून संबंधित राष्ट्रपुरुष/महान व्यक्तीचे माहिती फलक (संक्षिप्त परिचय) प्रदर्शित करण्याबाबत.
महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन परिपत्रक क्रमांक: GAD-49022/50/2024-GAD (DESK-29) मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई-400 032.
तारीख: 10 जानेवारी 2025.
संदर्भ:- GAD-49022/65/2024-GAD (DESK-29), दिनांक 27.12.2024.
परिपत्रक -:
वर्ष 2025 मध्ये मंत्रालयात आणि सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालयांमध्ये जयंती आणि राष्ट्रीय दिनाचे कार्यक्रम साजरे करण्यासंदर्भातील परिपत्रकाद्वारे सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
2. संदर्भातील शासन परिपत्रक राज्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये तसेच सर्व महाविद्यालये आणि सर्व शाळांना लागू करण्यात येत आहे.
3. महान व्यक्तीची जयंती साजरी करताना त्यांचे चरित्र (संक्षिप्त परिचय) दर्शविणारा फलक लावावा.
4. https://gad.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर "जयंती फलक" या शीर्षकाखाली (श्रेणी) राष्ट्रातील नामवंत व्यक्तींच्या चरित्रांची (संक्षिप्त परिचय) माहिती वेळोवेळी उपलब्ध करून दिली जाईल.
5. सनबोर्ड 23 इंच x 25 इंच आकाराच्या सनबोर्डवर राष्ट्रवादी/महान व्यक्तीची चरित्रात्मक माहिती (संक्षिप्त परिचय) मुद्रित करावी.
6. याबाबत झालेला खर्च संबंधित कार्यालयाच्या कार्यालयीन खर्चातून भागवला जावा.
7. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा संदर्भ क्रमांक २०२५०११०११३४०४९००७ आहे. सदर परिपत्रक डिजिटल स्वाक्षरीने प्रमाणित करून जारी करण्यात येत आहे.
आदेशाने आणि महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या नावाने,
Thursday, January 9, 2025
मुख्यमंत्री माझी सुंदर शाळा टप्पा २ पुरस्कार निघी वितरणाबाबत
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-२ या अभियानासाठी पारितोषिकाचा निधी वितरीत करण्यास मान्यता.
PM Poshan Update - प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदुळ प्राप्त, खर्च व लाभार्थी संखेची माहिती सादर करणे बाबत.
PM Poshan Update - प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदुळ प्राप्त, खर्च व लाभार्थी संखेची माहिती सादर करणे बाबत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदुळ प्राप्त, खर्च व लाभार्थी संखेची माहिती सादर करणे बाबत प्राथमिक शिक्षण संचालकांनी दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत माहे एप्रिल, २०२४ ते डिसेंबर, २०२४ या कालावधी करीता शाळा, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदांनी नोंदविलेल्या मागणीनुसार १०० टक्के तांदूळ भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामामधून उचल करुन शाळा व केंद्रीय स्वयंपाकगृहस्तरावर पुरवठा करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत राज्यातील विविध जिल्ह्यांना डिसेंबर, २०२४ व जानेवारी, २०२५ करीता तांदुळ नियतन मंजुर करण्यात आलेले आहे.
तथापि शाळा / केंद्रीय स्वयंपाकगृह प्रणाली संस्था तसेच पुरवठादार यांचेकडे शिल्लक असणाऱ्या तांदुळ व धान्यादी मालाचा आढावा न घेता पुढील तांदुळ मागणी करण्यात येत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे तांदुळ उचल, वाटप आणि लाभार्थी संख्या यांच्या प्रमाणामध्ये विसंगती आढळून येत आहे. सबब सोबत जोडण्यात आलेल्या विहित नमुन्यामध्ये सर्व शाळा आणि केंद्रीय स्वयंपाकगृह संस्था यांचेकडून अचूकपणे तांदूळ उचल, वाटप व शाळांस्तरावरील प्रत्यक्ष लाभार्थी संख्या यांची अचूक माहिती संकलित करुन प्राथमिक शिक्षण संचालनालयास दि. १५.०१.२०२५ पर्यंत सादर करण्यात यावी. जेणेकरुन जिल्ह्यांच्या मागणीनुसार पुढील तांदुळ नियतन मंजूर करणे सुलभ होईल. सदर माहिती त्वरीत संकलित करणेकरीता गुगल शीटचा उपयोग करण्यात यावा. जिल्ह्याची शाळानिहाय माहिती संचालनालयाकस सादर करुन नये, तालुकानिहाय एकत्रित माहिती सादर करण्यात यावी,
ज्या जिल्ह्यांची माहिती प्राप्त होणार नाही, अशा जिल्ह्याना पुढील कोणतेहीत तांदुळ नियतन मंजुर करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी तसेच जिल्ह्यांनी माहिती सादर करण्यात विलंब केल्यास व त्यामुळे तांदूळ नियतन मंजूर करण्यास विलंब झाल्यास त्याची जबाबदारी संबंधित जिल्ह्याची राहील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
(शरद गोसावी)
शिक्षण संचालक (प्राथमिक).
महाराष्ट्र राज्य, पुणे
वरील माहिती सादर करण्यासाठी पीडीएफ डाउनलोड
वरील परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
12 वी चा निकाल . HSC result-2025 दि. ५ मे २०२५ , दुपारी १:०० महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE)पुणे, यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या HSC 2025 परीक्षेचा निकाल तपासण्यासाठी खालील संकेतस्थळांना भेट द्या.
12 वी चा निकाल . HSC result-2025 दि. ५ मे २०२५ , दुपारी १:०० महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (...
-
वार्षिक नियोजन 2024 25 वर्ग पहिली ते दहावी सर्व शैक्षणिक पीडीएफ डाउनलोड एकाच ठिकाणी वर्ग एक ते आठ वेळापत्रक पीडीएफ डाउनलोड. ...
-
PAT परीक्षा answer key । शिक्षक मार्गदर्शिका खालील लिंक वर क्लिक करा आणि डाऊनलोड करा . https://drive.google.com/drive/folders/1ba7Y4piSpG-...
-
मंथन परीक्षेचा निकाल जाहीर मंथन वेलफेयर फौंडेशन कडून निकालाबाबत सूचना : 1) Manthan General Knowledge Examination 2025 निकाल Uploading जिल...