google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education: November 2024

Wednesday, November 27, 2024

शैक्षणिक दौऱ्यांबाबत नवीन नियमावली

 शैक्षणिक दौऱ्यांबाबत नवीन नियमावली


खाजगी वाहनाने प्रवास करण्यास बंदी


लोकप्रतिनिधी


नागपूर : जिल्ह्यातील सर्व


माध्यमातील तसेच सर्व मंडळाशी संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक विषयांचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक व शैक्षणिक गोष्टी प्रथमदर्शनी पाहता याव्यात यासाठी शैक्षणिक सहलींचे आयोजन केले जाते.


शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी कोणती खबरदारी घ्यावी याबाबतचे आदेश जारी केले आहेत. त्यानुसार वर्षातून एकच शैक्षणिक सहल आयोजित करावी, सहलीसाठी विद्यार्थ्यांना येण्याची सक्ती करू नये, विद्यार्थी व पालकांकडून संमतीपत्र घेण्यात यावे, तसेच सहभागी विद्यार्थ्यांची यादी व संपर्क क्रमांक जोडण्यात यावेत, सहलीचे शालेय व्यवस्थापन समितीच्या संमतीनेच आयोजित केले जाईल. ,


सहलीसाठी शिक्षकांची संख्या 10 विद्यार्थ्यांमागे एक असावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबदारी मुख्याध्यापकांची तसेच सहलीवरील सर्व शिक्षकांची असेल, सहलीमध्ये महिला विद्यार्थिनी सहभागी होत असतील तर ते अत्यावश्यक असेल. महिला शिक्षिकेसोबत सहलीला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसने जावे, शैक्षणिक सहलीसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाऊ नये. अशी अट घालण्यात आली आहे.



परख राष्ट्रीय सर्वेक्षणाच्या अमंलबजावणी बाबत...|

 दिनांक ०४ / १२ / २०२४ रोजी परख राष्ट्रीय


सर्वेक्षण जसे-२०२४

राज्यातील काही निवडक शासकीय, शासकीय अनुदानित व खाजगी मध्ये इयत्ता ३री, ६ वी व ९ वी मधील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात येणार आहे.

* सदर सर्वेक्षणात आपल्या जिल्ह्याची संपादणूकता वाढविण्याच्या दृष्टीकोनातून पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी.

१. जिल्ह्यामध्ये केंद्रस्तरावरील परिषदेत सदर सर्वेक्षण तपशील बदलाबाबत खालील माहिती देण्यात यावी.


२. त्या अनुषंगाने राज्यात सदर सर्वेक्षण अंमलबजावणी दिनांक ०४.१२.२०२४ रोजी करण्यात येणार आहे. सर्वेक्षणासाठी शाळांची निवड ही मनुष्यबळ विकास मंत्रालय व NCERT नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आली आहे. या कालावधीत सदर सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळांमध्ये इतर कोणत्याही उपक्रमाचे आयोजन करण्यात येऊ नये.

३. सर्वेक्षण दिनांक ०४.१२.२०२४ रोजी राज्यातील शासकीय, स्थानिक स्वराज्य

संस्थांमधील शाळा, खाजगी अनुदानित, खाजगी विना अनुदानित व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या यादृछिक पद्धतीने निवडलेल्या शाळांत घेण्यात येणार आहे.

४. सदर सर्वेक्षण हे दिनांक ०४.१२.२०२४ रोजी प्रत्यक्ष सर्वेक्षण होणार असल्याने सदर कालावधीत निवड झालेल्या शाळांमधील निवडण्यात आलेल्या वर्गातील १००% विद्यार्थ्यांना उपस्थित ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे.

५. ज्या शाळांना या कालावधीमध्ये सुट्टी आहे अशा शाळांमधील ज्या वर्गाचा समवेश सर्वेक्षण साठी झाला असेल त्या वर्गाला सर्वेक्षणाच्या दिवशी उपस्थित ठेवण्याबाबत सूचित करण्यात यावे.

६. शाळा सकाळ आणि दुपार सत्रात भरत असतील तरीही संबंधित शाळेतील निवड

झालेल्या इयत्तेसाठी सर्वेक्षण कालावधीत सर्वेक्षणाच्या खालील नियोजित वेळेनुसार

शाळा भरविण्यात यावी.

७.निवड झालेली शाळा जर बंद झाली असेल, तर तसा अहवाल CBSE निरीक्षक

नमूद करतील. तशा सूचना जिल्हा स्तरावरून CBSE निरीक्षकांना देण्यात याव्यात जेणे करून CBSE निरीक्षक त्या शाळेवर जाणार नाही.मात्र अहवाल तयार करून जिल्हा समन्वयक CBSE यांचेकडे जमा करावा.

८. सर्वेक्षणाच्या दिवशी जर काही शाळेत विद्यार्थ्यांची संख्या ५ पेक्षा कमी असेल तसेच विशेष मुलांची शाळा असेल अशा परिस्थितीत CBSE निरीक्षक व FI यांनी शाळा मुख्याध्यापकांसोबत संपर्क करून त्याबाबतचा अहवाल तयार करून तो दोन्ही जिल्हा समन्वयक याना द्यावा.



९.ज्या शाळांची निवड झाली आहे त्या शाळांना सर्वेक्षण संदर्भातील कार्यवाहीबाबत लेखी पत्र देण्यात यावे.

१०. रात्र शाळांची निवड झाली असेल व त्या शाळांच्या निवड झालेल्या वर्गांना सकाळच्या सत्रात येणे शक्य असेल अशा शाळांना वरील वेळापत्रकाप्रमाणे कळवावे अन्यथा त्यांच्या वेळेनुसार सर्वेक्षण आयोजित करावे. याबाबत संबंधित निरीक्षक व क्षेत्रीय अन्वेषक यांना अवगत करावे.

११. शाळा विशेष गरजा असणाऱ्या मुलांची (विशेष शाळा) असेल अशा परिस्थितीत या विद्यार्थ्यासाठी असणाऱ्या सुविधा नियमाप्रमाणे देऊन ( सहायक / मदतनीस / वाढीव वेळ) सर्वेक्षण घ्यावे. तसेच क्षेत्रीय अन्वेषकांना या मुलांना प्रश्नांचे अर्थ समजावून देण्यापर्यंत मदत करण्यात यावी अशा सूचना देण्यात याव्यात.

१२. शाळांचे माध्यम व सर्वेक्षणाकरिता निश्चित करण्यात आलेल्या माध्यमात बदल असेल तर अशा शाळेत सर्वेक्षणावेळी क्षेत्रीय अन्वेषकांना या मुलांना प्रश्नांचे अर्थ समजावून

देण्यापर्यंत मदत करण्याबाबत सूचना द्यावी.सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करावयाची


पूर्वतयारीः

१.OMR भरण्याचा सराव घेण्यात यावा.

२. चाचणीपूर्वी NAS २०१७, ETAS, MTAS सर्वेक्षण मधील प्रश्नांचा सराव घेण्यात यावा.

तसेच SLAS व PAT मधील प्रश्नांचा सराव घ्यावा.

3.विद्यार्थ्यांच्या सरावासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या

संकेतस्थळावर सराव प्रश्नपेढी उपलब्ध करून देण्यात आली आहे.


शाळाभेट:


सर्वेक्षण कालावधीत राष्ट्रीय व राज्य स्तरावरून काही शाळा भेटी करण्यात येणार आहेत. या शाळा वगळून जिल्हा स्तरावरून जिल्हा स्तरीय अधिकारी (प्राचार्य, वरिष्ठअधिव्याख्याता, अधिव्याख्याता DIET), शिक्षणाधिकारी प्राथमिक, माध्यमिक व उपशिक्षणाधिकारी यांच्या भेटींचे नियोजन करावे. सदर भेटी करताना खालील बाबींचा विचार करावा.

१) एका शाळेत दोन अधिकारी जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.

२) शाळा भेट वेळ सकाळी ११ ते ०५

३) सर्वेक्षण भेटीदरम्यान विद्यार्थ्याना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही याची दक्षता घेणे.

४) सर्वेक्षण कार्यवाहीचे निरीक्षण करून भेट प्रपत्र भरावे व ते जिल्हा समन्वयक यांचेकडे जमा करावेत.


तसेच सदर सर्वेक्षणाच्या अनुषंगाने करण्यात येणाऱ्या कार्यवाही बाबत प्राचार्य व शिक्षणाधिकारी यांनी एकत्रीतपणे मा. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्वेक्षणाबाबत अवगत करावे.यासंदर्भात सर्वेक्षणाच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत दिनांक २८ नोव्हेंबर २०२४ रोजी सायं ४ वाजता मा.आयुक्त शिक्षण यांचे उपस्थितीत सर्व जिल्हाधिकारी, सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी,शिक्षण संचालक प्राथमिक व माध्यमिक, सर्व आयुक्त मनपा, सर्व विभागीय उपसंचालक, सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक/माध्यमिक नपा/ नगर परिषद, प्रशासन अधिकारी मनपा/नपा यांची ऑनलाईन बैठक आयोजित करण्यात येणार आहे.

सदर बैठकीची लिंक त्याच दिवशी सकाळी राज्य परख सर्वेक्षण ग्रुप वर व संबंधितांच्या मेलवरती देण्यात येईल.तसेच या बैठकीवेळी जिल्ह्यातील निवड झालेल्या शाळांमधील मुख्याध्यापक, क्षेत्रीय अन्वेषक (FI) यांना YOU TUBE च्या माध्यमातून हजर राहण्याबाबत आपले स्तरावरून सूचना देण्यात याव्यात. सदर YOU TUBE लिंक त्याच दिवशी सकाळी राज्य परख सर्वेक्षण ग्रुप वर व

संबंधितांच्या मेलवरती देण्यात येईल.

तरी राष्ट्रीय स्तरावरील सर्वेक्षण यशस्वी होण्याच्या दृष्टिकोनातून योग्य त्या सूचना देण्यात याव्यात. तसेच जिल्हास्तरावर कार्यवाही करताना जिल्हा समन्वयक म्हणून प्राचार्य जिल्हा शिक्षण

व प्रशिक्षण संस्था व शिक्षणाधिकारी प्राथमिक / माध्यमिक यांनी समन्वयाने सदर उपक्रमाचे नियोजन व अंमलबजावणी करावी..


संबंधित माहितीचे अधिकृत शासनाचे परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा.

Download


जनगणना केलेल्या कालावधीच्या बदली रजा देणेबाबत चे परीपत्रक.

जनगणना केलेल्या कालावधीच्या बदली रजा देणेबाबत चे परीपत्रक.

मे-जून २०१० या कालावधीत जनगणनेच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षक कर्मचा-यांना बदली रजा मंजूर करण्याबाबत प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.याबाबत शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.मे-जून २०१० या उन्हाळी सुटीत ज्या शिक्षकांनी जनगणनेचे काम केले असेल त्यांच्या अर्जित रजेच्या खात्यात त्यांनी जेवढे दिवस काम केले असेल तेवढे दिवसांची रजा जमा करावी . त्याचप्रमाणे ज्या शिक्षक संवर्गातील कर्मचा-यांना त्यांचे शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी बदलीरजा उपभोगता आली नाही त्यांना त्या बदली रजा २०१०-११ या शैक्षणिक वर्षात नेहमीच्या अटीवर उपभोगण्यास किंवा सदरची रजा त्यांच्या अर्जित रजेच्या खात्यात जमा करण्यास मंजूरी देण्यात येत

आहे.मात्र जनगणनेच्या कामाच्या कालावधीचे प्रमाणपत्र संबंधीत प्रधान जनगणनाअधिकारी किंवा जनगणना चार्ज अधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतरच संबंधित शिक्षकांना सदरची रजा अनुज्ञेय होईल.

सदरचे परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध असून, त्याचा सांकेतांक

क्रमांक २०१०१०२९१४३३३४००१ आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

                    Download





Sunday, November 24, 2024

आगाऊ वेतनवाढ देणेबाबत , अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित ; दि.18.11.2024

जिल्हा स्तरावरुन पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचे लाभ देणेबाबत , राज्य शासनांच्या ग्रामविकास विभाग मार्फत दि.18 नोव्हेंबर 2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरचे शासन परिपत्रक हे राज्य शासनांच्या दि.01.07.2022 व दि.06.10.2023 रोजीच्या संदर्भाधिन पत्रानुसार निर्गमित करण्यात आलेला आहे . तर सदरचे परिपत्रक हे राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रति सादर करण्यात आलेला आहे .

सदरच्या परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेले आहेत कि , मा.उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने सन 2018 पर्यंत ज्या आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढीचा लाभ देण्यात आलेला नाही , अशा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षकांना , जिल्हा परिषदेकडे प्राप्त होणाऱ्या ..

स्वनिधीतुन आगाऊ वेतनवाढीपोटी अनुज्ञेय देय होणारी रक्कम तात्काळ अदा करण्याबाबत , शासनांच्या संदर्भाधिन पत्रानुसार , सर्व जिल्हा परिषदांना यापुर्वी कळविण्यात आलेले आहेत . तसेच जिल्हा परिषदेने स्वनिधी अर्थसंकल्पात त्याप्रमाणे तरतुद करावी असे नमुद करण्यात आलेले आहेत .

तसेच दि.01.07.2022 व दि.06.10.2023 रोजीच्या पत्रानुसार दिलेल्या सूचना स्वयंस्पष्ट असून , त्यानुसार तात्काळ कार्यवाही करण्याचे तसेच सदरच्या प्रकरणी मा.न्यायालयाचा अवमान होणार नाही , याची दक्षता घेण्याची विनंती करण्यात आलेली आहे .

Friday, November 22, 2024

हर घर संविधान" अभियान - संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करणेबाबत नवीन आदेश 22/10/2024

 

हर घर संविधान" अभियान - संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ पासून "घर घर संविधान" कार्यक्रम साजरा करणेबाबत नवीन आदेश 22/10/2024

संदर्भ : १. महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग शासन निर्णय क्रमांकः बीसीएच-२०.क्र.प्र/२४२५९२-शिक्षण/ मंत्रालय विस्तार, मुंबई दिनांक: १०/१०/२०२४

२. उपसचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन यांचे पत्र संकीर्ण २०२४/प्र.क्र.३३४/एसडी-४ दि.२२/११/२०२४

३. शालेय शिक्षा व साक्षरता विभाग, शिक्षा मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र दि.२१/११/२०२४

दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयं अर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरुकता, तसेच घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबददल सर्व नागरिकांमध्ये जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" साजरा करण्यासाठी संदर्भ क्र १ अन्वये कळविले आहे. तसेच संविधान अमृत महोत्सव सन २०२४-२५ "घर घर संविधान" अंतर्गत घ्यावयाचे स्पर्धा व उपक्रम याबाबत विस्तृत सूचना दिलेल्या आहेत.

दिनांक २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी आपण संविधान स्वीकृत करुन दिनांक २६ जानेवारी, १९५० पासून संविधानाची अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते

व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा प्रचार व प्रसार करणे, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना बळकट होईल.

५. राष्ट्रीय एकात्मताः-

२. राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय व अनुदानित वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा / आश्रमशाळा व वसतिगृहे ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था व महाराष्ट्र विधानपरिषद/विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच उपेक्षित समुदायांमध्ये घटनात्मक अधिकार व कर्तव्यांबदल जागरुकता वाढविण्यासाठी संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर संविधान" साजरा करण्याच्या अनुषंगाने खालील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात यावे.

संविधान अमृत महोत्सव २०२४-२५ "घर घर संविधान" अंतर्गत घ्यावयाचे स्पर्धा / उपक्रम :-

प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक / बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित/ विनाअनुदानित/ स्वयंअर्थसहाय्यित शाळा/ आश्रमशाळा व वसतिगृहे.

१. शाळा/महाविद्यालय / वसतिगृहे यांच्या दर्शनी भागात संबंधित सर्व विभाग संविधानाची उद्देशिका लावणे

२. शालेय परिपाठात तसेच वसतिगृह प्रार्थनेत दररोज संविधान प्रास्ताविका/उद्देशिकचे वाचन विद्यार्थ्यांकडून करवून घेणे.

३. शालेय वाचनालयात संविधानाच्या किमान पाच प्रती विद्यार्थ्यांना वाचनासाठी उपलब्ध करवून देणे

४. भारतीय संविधान बाबत सर्वसाधारण माहिती देणे, जसे, निर्मिती, निर्मिती समिती, अनुच्छेद, विशेषता, कर्तव्ये यावर व्याख्यान (किमान ६० ते ९० मिनिटे)

५. विद्यार्थ्यांना भारतीय संविधानातील प्रमुख प्रकरणे, हक्क, आणि  यांवर मार्गदर्शन करणे

६. कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांना संविधानाचे तत्त्वज्ञान आणि मूल्ये समजावून सांगणे.

७. संविधान मुल्ये यावर पथनाट्य तयार करणे 

८. शाळा/महाविद्यालयात संविधानाच्या विविध मुद्यांवर फलक, पोस्टर, आणि प्रदर्शन आयोजित करणे

9. संविधान दिन कार्यक्रम आयोजित करणे, ज्यात पथनाट्य आणि पोस्टर प्रदर्शन याचा समावेश करावा.

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 

                        Download