google.com, pub-4946049474649373, DIRECT, f08c47fec0942fa0 t Tech Education

Monday, May 27, 2024

प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्मितीकरीता पूर्वतयारी करणे व सर्व शाळांना निर्देश देणे बाबत.

 प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबाग निर्मितीकरीता पूर्वतयारी करणे व सर्व शाळांना निर्देश देणे बाबत.



केंद्र शासनाने प्रधान मंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित भाजीपाला व इतर पदार्थांचा समावेश शालेय पोषण आहारामध्ये करण्याचे निर्देश दि. १५ ऑक्टोबर, २०१९ रोजीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार दिले आहेत. त्यानुषंगाने विद्यार्थ्यांनी परसबागेत पिकवलेला भाजीपाला, फळे इत्यादींचा समावेश शालेय पोषण आहारात करुन विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यात येत आहे. परसबाग निर्मितीमुळे विद्यार्थ्यांची निसर्गाशी जवळीक निर्माण होवून त्यांना नवनिर्मितीचा आनंद मिळणे, ताज्या भाजीपाल्याचा समावेश पोषण आहारात होवून विद्यार्थ्यांना पौष्टिक आहार उपलब्ध होणे असे विविध चांगले हेतू या उपक्रमामुळे साध्य होत आहेत.

प्रस्तुत योजनेंतर्गत परसबाग उपक्रम प्रभावीपणे राबविण्यासाठी सन 2023-24 या शैक्षणिक वर्षामध्ये शासनाने उत्कृष्ठ परसबाग स्पर्धा आयोजित केली होती. त्याचा परिणाम म्हणून राज्यामधील सुमारे 25000 शाळांमध्ये परसबाग निर्माण झालेल्या आहेत.

■ नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्याच्या अनुषंगाने परसबाग निर्माण करण्याकरीता शाळास्तरावर शाळा व्यवस्थापन समिती, पालक, गावातील प्रगतीशील शेतकरी या सर्वांच्या सहकार्याने परसबाग निर्मितीकरीता आवश्यक ती पूर्वतयारी करणेकरीता खालील प्रमाणे सर्व जिल्ह्यांना तसेच शाळांना निर्देश देण्यात येत आहेत.

● प्रस्तुत उपक्रमांतर्गत परसबाग निर्मितीकरीता शाळांनी नजिकचे कृषि विज्ञान केंद्र, कृषि शाळा, कृषि विभागातील कृषि सहायक / पर्यवेक्षक, कृषि क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय संस्था (NGO), सेंद्रिय शेती करणारे पालक, शेतकरी, कृषि तज्ज्ञ यांचे मार्गदर्शन व सहकार्य घेण्यात यावे.

● परसबाग निर्मितीकरीता आवश्यक जमीनीची मशागत, नागरणी इत्यादी कामे पूर्वतयारीच्या अनुषंगाने शाळा व्यवस्थापन समिती, पालक, गावातील प्रगतीशील शेतकरी या सर्वांच्या सहकार्याने करावीत.

● परसबागेमध्ये पुढील वर्षांमध्ये कोणकोणत्या भाजीपाल्याची लागवड करावयाची याची पूर्वनिश्चिती करुन घेण्यात यावी तसेच याकरीता स्थानिक पातळीवर बियाण्यांची उपलब्धता करुन ठेवण्यात यावी.

● परसबागेस वर्षभर पुरेल याकरीता पाण्याचे आवश्यक नियोजन करण्यात यावे. पाण्याची उपलब्धतेच्या अनुषंगाने पाणी बचतीकरीता ठिबक सिंचन, तुषार सिंचनाची व्यवस्था करण्यात यावी, याकरीता लोकसहभाग मिळविणेचा प्रयत्न करणे.

● परसबाग ही पूर्णपणे सेंद्रिय असेल याकडे विशेष लक्ष द्यावे, कोणत्याही परिस्थितीमध्ये परसबागेकरीता रसायनांचा वापर करु नये. विशेषतः कमी जागेमध्ये मायक्रोग्रीन पध्दतीने पोषक पालेभाज्यांची लागवड करता येते.

● नागरी भागातील शाळांमध्ये विशेषः ज्या ठिकाणी जागेच्या उपलब्धतेबाबत अडचणी आहेत, अशा शाळांमध्ये व्हर्टिकल गार्डनची उभारणी करण्यात यावी. शासनाने याकरीता दि. 11 जुलै, 2023 रोजीच्या शासन निर्णयामध्ये विस्तृत सूचना दिलेल्या आहेत.

● नागरी भागामध्ये विशेषतः बृहन्मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, अमरावती व छत्रपती संभाजीनगर या भागातील शाळांमधून परसबागांची उभारणी करण्याकरीता विशेष तज्ञ लोकांचे मार्गदर्शन उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने शासनाने दि. 27 फेब्रुवारी, 2024 रोजी तज्ञांची समिती स्थापन करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. संबंधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी आणि प्रशासन अधिकारी, महानगरपालिका यांनी याबाबत शासन निर्देशानुसार कार्यवाही करुन आपल्या कार्यक्षेत्रातील अधिकाधिक शाळांमधून परसबागांची उभारणी करणेकरीता विशेष प्रयत्न करावेत.

■ केंद्र शासनाच्या निर्देशाप्रमाणे राज्यातील सर्व शाळांमध्ये परसबागा निर्माण करुन सदर परसबागांमधून उत्पादित ताजा भाजीपाला यांचा वापर शालेय पोषण आहारामध्ये करण्यात यावा.

■ प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत पसरबाग उपक्रमास प्रोत्साहन देण्याकरीता परसबाग स्पर्धाचे आयोजन करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे.

■ राज्यात उत्कृष्ट परसबागा तयार होण्याच्या दृष्टीने सदर परसबाग उपक्रमास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. याकरीता उत्कृष्ट परसबाग स्पर्धचे तालुका, जिल्हापातळीवर माहे ऑगस्ट, 2024 ते ऑक्टोबर, 2024 या कालावधीमध्ये आयोजन करण्यात येणार आहे ज्यामुळे परसबाग निर्मितीस प्रोत्साहन मिळेल.

■ सन 2024-25 या वर्षामध्ये शासनाने गतवर्षीच्या पेक्षा अधिक संखेने शाळांना उपक्रमामध्ये सहभागी होता यावे या अनुषंगाने बक्षीसांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेतलेला आहे.


परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

              Download


Saturday, May 25, 2024

या मतदान केंद्रावर 'मॉक पोल'ची मते क्लीअर न करताच घेतले मतदान! अत्यंत महत्वाची अपडेट...तर..मतमोजणी नाही.

 

या मतदान केंद्रावर 'मॉक पोल'ची मते क्लीअर न करताच घेतले मतदान! अत्यंत महत्वाची अपडेट...तर..मतमोजणी नाही.





 मतदान केंद्रावर 'मॉक पोल'ची मते क्लिअर न करता मतदान घेतल्याची माहिती समोर आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणतात, 'त्या' केंद्रावरील मते मोजणार नाही. 


नागपूर लोकसभा मतदार संघातील एका बूथवरील मतदान मोजण्यातच येणार नसल्याची धक्कादायक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. या केंद्रावर 'मॉक पोल'ची मते क्लिअर न करताच मतदान घेतले गेल्याची माहिती मतदानाच्या तब्बल ३५ दिवसांनंतर समोर आली आहे. या मतदान केंद्रावर फेरमतदान घेण्यात यावे, अशी मागणी इंडिया आघाडीतील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार विकास ठाकरे यांनी केली आहे.


लोकसभा निवडणुकीतील मतमोजणीला अवघे नऊ दिवस शिल्लक आहेत. मात्र, निवडणूक यंत्रणेतील त्रुटी संपताना दिसत नाहीत. मतदानाच्या दिवशी नियमानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी साडेपाच वाजता मॉक पोलिंग (प्रारूप मतदान) घेण्यात येते. त्यानंतर कंट्रोल युनिटवरील क्लोज रिझल्ट क्लीअर करून प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होत असते. मात्र प्राप्त माहितीनुसार मतदान केंद्र क्र. २३३, दादाजी धुनिवाले महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा, रविनगर या केंद्रावर मॉक पोलिंग क्लिअर न करताच मतदान घेण्यात आले.


विजयाचा फरक ३१५ पेक्षा जास्त असेल तर मतमोजणी नाही


केंद्र क्र. २३३, दादाजी धुनिवाले महानगरपालिका उच्च प्राथमिक शाळा, रविनगर या बूथवरील मतदानासंदर्भातील माहिती निवडणूक आयोगाला आधीच कळविण्यात आली आहे. फॉर्म १७ सी मधील नोंदीनुसार या बूथवर ३१५ मतदान झाले आहे. निवडणूक आयोगाच्या गाईडलाईननुसार त्या केंद्रावरील मतमोजणी होणार नाही. जर विजयी उमेदवार व दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार यांच्या मतातील फरक ३१५ मतांपेक्षा कमी असेल तर मतमोजणी होईल. त्यापेक्षा जास्त फरक असेल तर मतमोजणी करणार नाही.


https://www.techeducation.live/2024/05/blog-post_25.html


शिक्षकच नव्हे हो, आता तर मुख्याध्यापकही होणार अतिरिक्त


शिक्षकच नव्हे हो, आता तर मुख्याध्यापकही होणार अतिरिक्त



१५० पेक्षा पटसंख्या कमी असू नये : संच मान्यतेच्या नवीन निकषात तरतूद

म्हणजेच जून २०२४-२५ पासून या

तर अतिरिक्त मुख्याध्यापकाचे असे होणार समायोजन


लोकमत न्यूज नेटवर्क तिरोडा : आतापर्यंत आपण शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त होतात, हे पाहिले आहे. पण आता शाळेतील मुख्याध्यापक सुद्धा अतिरिक्त झाल्यास आश्चर्य वाटून घेऊ नका. संच मान्यतेच्या नवीन निकषात तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे पैसे वाचवण्यासाठी शासनाने शिक्षण क्षेत्राला वेटीस धरू नये, अशी अपेक्षाही मुख्याध्यापक व शिक्षण तज्ज्ञ करीत आहेत.


शासन निर्णयानुसार पद निश्चिती


■ या आदेशानुसार अतिरिक्त मुख्याध्यापकाचे त्यांच्या संस्थेच्या इतर शाळा असतील व तेथे मुख्याध्यापक पद रिक्त असेल, तर त्याच संस्थेच्या शाळेत समायोजन होईल, जागा रिक्त नसेल तर जिल्ह्यात ज्या शाळेत मुख्याध्यापक पद रिक्त असेल, त्या शाळेत समायोजन होईल. तेथेही जागा रिक्त नसेल तर त्या अतिरिक्त मुख्याध्यापकाला शिक्षक म्हणून समायोजित केले जाईल. म्हणजेच दहा-पंधरा वर्षे जी व्यक्ती मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होती, ती व्यक्ती आता शिक्षक म्हणून आपला उर्वरित


होईल. त्यातील तरतुदीनुसार आता माध्यमिक शाळेतील सर्व वर्गाची विद्यार्थी संख्या जर १५० पेक्षा कमी झाली, तर त्या शाळेतील मुख्याध्यापक अतिरिक्त ठरेल. एका अर्थाने त्या शाळेत मुख्याध्यापक असणार नाही. इंजिनविना ही शैक्षणिक गाडी धावणार. विशेष म्हणजे या शासन निर्णयात यापूर्वीचे या विषयाशी संबंधित म्हणजेच शाळातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पद मान्यता ठरविणारे म्हणजे २८ ऑगस्ट २०१५, ८ जानेवारी २०१६, २ जुलै २०१६ व १ जानेवारी २०१८ हे चारही शासन निर्णय या नव्या आदेशानुसार अधिक्रमित केले आहेत. अतिरिक्त ठरविण्यासाठी आता सन २०२४-२५ पासून हाच, म्हणजे १५ मार्च २०२४ चा शासन निर्णय ग्राह्य धरला जाणार आहे.


१५ मार्च २०२४ रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संच मान्यतेचा सुधारित निकष या गोंडस नावाचा एक शासन निर्णय निर्गमित केला आहे. त्याच शासन आदेशात मुख्याध्यापकाचे पद अनुज्ञेय होण्यासाठी सुद्धा कलम ४ आणि ४.१ मध्ये काही निकष दिलेले आहेत. त्यानुसार येत्या शैक्षणिक वर्षापासून,


कार्यकाळ घालवेल, ही एक प्रकारची पदावन्नतीच ठरणार आहे.


वेतन मात्र तेच कायम राहणार


मुख्याध्यापक अतिरिक्त ठरेल आणि त्यांच्यावर शिक्षक म्हणून काम करण्याची जवाबदारी आली तरी त्याच्या वेतनास संरक्षण असेल. म्हणजेच शिक्षक म्हणून कार्यरत राहिले तरी त्याला पूर्वी मुख्याध्यापक म्हणून जे वेतन मिळत होते तेच कायम राहील. मात्र, शाळा मुख्याध्यापकाविना कशी चालवायची ही एक तारेवरची कसरतच ठरेल, यात शंका नाही.


Maharashtra Board 10th Result 2024 Date : अखेर प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी लागणार दहावीचा निकाल, अत्यंत मोठी अपडेट

 

Maharashtra Board 10th Result 2024 Date : अखेर प्रतिक्षा संपली, ‘या’ दिवशी लागणार दहावीचा निकाल, अत्यंत मोठी अपडेट


Maharashtra Board 10th Result 2024 Date : नुकताच बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. आता दहावीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा आहेत. दहावीचा निकाल कधी जाहीर होणार याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातंय. 27 मे लादहावीचा निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आलाय. विशेष म्हणजे निकालाच्या टक्क्यात मोठी वाढ झालीये. यंदाही दरवेळीप्रमाणेच मुलींनी निकालात बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुली या वरचढ ठरल्या आहेत. कोकण विभाग निकालात अव्वल ठरलाय. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून काही दिवसांपूर्वीच स्पष्ट करण्यात आले होते की, बारावीचा निकाल मेच्या तिसऱ्या आठवड्यात आणि दहावीचा निकाल हा २७ मे ला  केला जाईल. आता विद्यार्थ्यांसह पालकांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा लागली.
mahahsscboard.in, mahresult.nic.in, msbshse.co.in या साईटवर जाऊन विद्यार्थी दहावीचा निकाल पाहू शकतात. अगोदर ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर केला जाईल, त्यानंतर काही दिवसांनी विद्यार्थ्यांना मार्कशीट मिळेल. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारलीये. आता दहावीच्या निकालात कोण बाजी मारते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

                         Download


Friday, May 24, 2024

राज्यात पुन्हा आचारसंहिता! मुंबई आणि नासिक शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर!

 

राज्यात पुन्हा आचारसंहिता! मुंबई आणि नासिक शिक्षक व पदवीधर मतदार संघाची निवडणूक जाहीर!

भारतीय निवडणूक आयोगाने दिनांक 24 मे 2024 रोजी जाहीर केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार मुंबई व नाशिक विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर करण्यात आली आहे त्यामुळे राज्यात पुन्हा आचारसंहिता लागू झाली आहे. 



मुंबई आणि नासिक शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर


निवडणूक कार्यक्रम—


1) उमेदवारी अर्ज भरणे -

31 मे 2024 ते 07 जून 2024

2) अर्ज छाननी - 10 जून 2024


3) उमेदवारी माघारीची अंतिम तारीख - 12 जून 2024


4) मतदान दिनांक - 26 जून 2024

वेळ - सकाळी 8.00 ते सायं. 4.00

5) मतमोजणी - 1 जुलै 2024


सदर परिपत्रकानुसार आजपासून पुन्हा आचारसंहिता लागू झाली असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया ही कोविड-19 साठीची नियमावली वापरून पूर्ण पाडली जाणार आहे.


 

परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

Download



अकरावी बारावी साठी यानंतर इंग्रजी विषय अनिवार्य नसणार? कला वाणिज्य विज्ञान अशी शाखा विभाजनही बंद होणार?

 

अकरावी बारावी साठी यानंतर इंग्रजी विषय अनिवार्य नसणार? कला वाणिज्य विज्ञान अशी शाखा विभाजनही बंद होणार?


इयत्ता 3 री ते 12 वी इयत्तांचा अभ्यासक्रम, पाठ्यक्रम तयार करणेसाठी मार्गदर्शक ठरणारा राज्य अभ्यासक्रम आराखडा  (शालेय शिक्षण)- 2024 मसुदा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत तयार करण्यात आला आहे.

 सदर आराखड्यानुसार.. 

अकरावीला कला, वाणिज्य, विज्ञान विभाजन बंद

विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडीची संधी; इंग्रजी अनिवार्य नाही; राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यात समावेश.


अकरावी व बारावीला सध्या असलेल्या कला, वाणिज्य आणि विज्ञान अशा विविध शाखांमध्ये असलेले विभाजन आता भविष्यात राहणार नाही. तर विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम निवडीची संधी दिली जाणार आहे. त्यानुसारच अभ्यासक्रम शिकवला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आता भाषा शिक्षणातून दोन विषयांचाच अभ्यास करावा लागणार आहे. किमान एक भाषा मूळची भारतातील असावी लागणार आहे. विशेष म्हणजे या वर्गासाठी आता इंग्रजी हा विषय अनिवार्य राहणार नाही

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आला आहे. तिसरी ते बारावीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा तयार केला आहे. हा मसुदा नागरिकांसाठी जाहीर करण्यात आला

. आहे. ३ जूनपर्यंत सूचना आणि आक्षेप नोंदवता येणार आहेत. राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांतील अभ्यासक्रमात महत्त्व-


पूर्ण बदल होणार आहेत. अकरावी आणि बरावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमातील आशयाचे ओझे कमी करुन चिंतनासाठी अधिक वेळा दिला जाणार आहे. शाखांचे ओझे आता असणार नाही विद्यार्थी संगणक विज्ञान किंवा बँकिंग यांसारख्या बायफोकल विषयाची निवड करून दुसरी भाषा सोडू शकणार आहे. ही तरतूद नव्या धोरणात आली आहे. यामुळे शालेय शिक्षण व्यवस्थेत यापुढे कला, विज्ञान आणि वाणिज्य या विषयांची संकल्पना राहणार नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांच्या आवडीचा विषय निवडण्याचा पर्याय असणार आहे. मसुद्यानुसार नवीन आराखड्यातील निवडक विषयांची तीन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे ज्यात विज्ञान आणि वाणिज्य आणि व्यवस्थापन, सामाजिक विज्ञान, कला शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण, गणित आणि संगणकीय विचार आणि आंतरविद्याशाखीय क्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना तीन गटांपैकी किमान दोन गटांमधून चार विषय (वैकल्पिक पाचवा विषय अस- लेले) निवडण्याची सक्ती असणार आहे.

• तीन भाषा शिकणे प्रत्येक विद्यार्थ्यांला तीन भाषा येणे आणि त्यासाठी त्याला सक्षम बनवणे हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडयाचे ध्येय आहे. बहुभाषिकता मुळे विद्यार्थ्याला संवादाचे अनेक पैलू, सांस्कृतिक समृद्धता आणि बहुविध बोधात्मक क्षमतांचा विकास असे अनेक फायदे होतात. विद्यार्थी आपल्या शालेय जीवनात तीन भाषा शिकतील. या तीन भाषांतील पर्याय म्हणून संस्कृत भारतीय भाषादेखील उपलब्ध असेल. ज्यामुळे प्राचीन भारतीय परंपरेची ओळख विदयार्थ्यांना होईल, हा हेतूही व्यक्त करण्यात आला आहे.

धार्मिक व्यक्तींच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्याची सूचनाही मसुद्यात करण्यात आली आहे. तसेच शेती, पशुपालन, भारतीय सण, भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी, खगोलशास्त्र आणि इतर विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

• तीन भाषा शिकणे प्रत्येक विद्यार्थ्यांला तीन भाषा येणे आणि त्यासाठी त्याला सक्षम बनवणे हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडयाचे ध्येय आहे. बहुभाषिकता मुळे विद्यार्थ्याला संवादाचे अनेक पैलू, सांस्कृतिक समृद्धता आणि बहुविध बोधात्मक क्षमतांचा विकास असे अनेक फायदे होतात. विद्यार्थी आपल्या शालेय जीवनात तीन भाषा शिकतील. या तीन भाषांतील पर्याय म्हणून संस्कृत भारतीय भाषादेखील उपलब्ध असेल. ज्यामुळे प्राचीन भारतीय परंपरेची ओळख विदयार्थ्यांना होईल, हा हेतूही व्यक्त करण्यात आला आहे.


• धार्मिक व्यक्तींच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्याची सूचनाही मसुद्यात करण्यात आली आहे. तसेच शेती, पशुपालन, भारतीय सण, भारतीय विज्ञान, तंत्रज्ञान अभियांत्रिकी, खगोलशास्त्र आणि इतर विषयांचा समावेश करण्यात आला आहे.


दहावीसाठी दहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार

पॅटर्न बदलला, बारावीसाठी दोन भाषा विषयांसह किमान दोन गटांतील विषयांत व्हावे लागणार उत्तीर्ण.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी-बारावी परीक्षा पध्दतीत बदल करण्यात येणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांना पास होण्यासाठी दहा विषयांची परीक्षा द्यावी लागणार आहे, तर बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा विषयांसह किमान दोन गटांमधील सर्व विषयांमध्ये उत्तीर्ण व्हावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्या प्राधिकरणाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या तिसरी ते बारावीच्या राज्य अभ्यासक्रम आराखड्यात दहावी-बारावी परीक्षेच्या बदलांबाबत नमूद करण्यात आले आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद अर्थात विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला तिसरी ते बारावीचा राज्य अभ्यासक्रम आराखडा जनतेसाठी खुला करण्यात आला असून त्यावर जनतेचे अभिप्राय मागविण्यात आले आहेत.

आराखड्यावर आता अभिप्राय मागविण्यात आले आहेत. त्यानंतर मसुदा अंतिम होईल. त्यानंतर दहावी-बारावी परीक्षासंदर्भात शासन धोरण निश्चित करेल, शासनाच्या धोरणानुसार दहावी- बारावीच्या परीक्षा पध्दतीमध्ये बदल करण्यात येणार असून शासनाच्या निर्देशानुसार त्याची अंमलबजावणी करण्यात येईल.

- शरद गोसावी, अध्यक्ष राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ


https://www.techeducation.live/2024/05/maharashtra-board-10th-result-2024-date.html